'आम्ही संजू सॅमसनकडे नक्कीच पाहू. तो भारतीय विकेटकीपर आणि बॅटरही आहे. विकेट कीपिंगसोबत तो ओपनिंगची जबाबदारीही पार पाडू शकतो. जर संजू उपलब्ध असेल तर आम्ही त्याला नक्कीच टीममध्ये घेऊ इच्छितो. त्याच्यासोबत कोणाला ट्रेड करणार, याबाबत आम्ही निर्णय घेतलेला नाही, कारण चर्चा अजून तिथपर्यंत पोहोचलेली नाही, पण नक्कीच आम्ही संजूला टीममध्ये सामील करू इच्छितो', असं सीएसकेचा एक वरिष्ठ अधिकारी क्रिकबझसोबत बोलताना म्हणाला.
advertisement
संजू सॅमसनची आयपीएल 2025 मधील कामगिरी निराशाजनक झाली. या मोसमात राजस्थानला प्ले-ऑफमध्येही प्रवेश मिळवता आला नाही. संजूने 2025 च्या आयपीएल मोसमात 9 सामन्यांमध्ये 35.63 च्या सरासरीने फक्त 285 रन केले, यात एका अर्धशतकाचा समावेश होता. आयपीएल 2025 मध्ये संजूचा सर्वाधिक स्कोअर 66 रन होता. तर दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्स या मोसमात पॉईंट्स टेबलमध्ये शेवटच्या म्हणजेच दहाव्या क्रमांकावर राहिली.
संजू ठरू शकतो हुकमी एक्का
संजू सॅमसनकडे आयपीएल खेळण्याचा बराच अनुभव आहे. आयपीएलमध्ये संजूने 177 सामन्यांमध्ये 139.05 च्या स्ट्राईक रेटने 4,704 रन केले आहेत, तसंच त्याच्या नावावर 3 शतकंही आहेत. संजू सॅमसन विकेट कीपिंग, बॅटिंगसह टीमचं नेतृत्वही करू शकतो. संजूने त्याच्या नेतृत्वात राजस्थानला आयपीएल 2022 च्या फायनलमध्ये पोहोचवलं होतं. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईची मागच्या मोसमातली कामगिरी निराशाजनक झाली होती.
ऋतुराज गायकवाडला दुखापतीमुळे मागचा मोसम पूर्ण खेळता आला नव्हता, त्यानंतर धोनी पुन्हा एकदा सीएसकेचा कर्णधार झाला. संजू जर सीएसकेच्या टीममध्ये आला तर त्यांच्या बहुतेक अडचणी दूर होतील, कारण त्यांना ओपनर, विकेट कीपर आणि कॅप्टन या तीनही भूमिका पार पाडणारा खेळाडू मिळेल. तसंच धोनी पुढची आयपीएल खेळणार का नाही? याबाबत सस्पेन्स असतानाच संजू टीममध्ये आला तर तो धोनीची जागा भरून काढू शकतो.