केएल राहुल आणि करुण नायरची मैत्री
केएल राहुल आणि करुण नायर यांच्यात कर्नाटकातील सुरुवातीच्या काळापासून एक मजबूत नाते आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि नंतर इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये ते एकत्र खेळले आहेत. ते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स सारख्या संघांसाठी एकत्र खेळले आहे. नायरने आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्समध्ये राहुलसोबत पुन्हा एकत्र येण्याबद्दल उत्साह व्यक्त केला आहे, त्यांच्या सामायिक इतिहासाची आणि देशांतर्गत भागीदारीची आठवण करून दिली आहे. यानंतर करुण आणि केएल राहुल आता पुन्हा एकदा टेस्ट क्रिकेटमध्ये देखील खेळताना दिसणार आहेत.
advertisement
केएलने ठेवलं करुणच्या खांद्यावर डोकं
आयपीएल 2025 च्या हंगामातील शेवटचा सामना दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्जविरुद्ध खेळला. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने 6 गडी राखत जिंकला. यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक विडिओ शेअर केला आहे. हा विडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात केएल राहुलचं रौद्र रूप सर्वांचं पाहिलं पण केएलचं हे सौम्य आणि निरागस रूप फार कमी लोकांनी पाहिले असेल. शनिवारी बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. यात अनेक तरुणांना संधी देण्यात आली तर करुण नायरने देखील टीम इंडियामध्ये कमबॅक केलं आहे. 8 वर्षानंतर करुणला पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये स्थान भेटले आहे. दिल्ली कॅपिटल्सने 'टुगेदर फॉर इंडिया' या कॅप्शनसह केएल आणि करुणचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हिडिओमध्ये विशेष काय?
हा व्हिडिओ चाहत्यांना फारच आवडला आहे. त्याच कारण असं की, केएल राहुलचं अग्रेशन सर्वाना माहिती आहे. तो जितका शांत आहे तो खेळाच्या बाबतीत तितकाच अग्रेसिव्ह आहे. अशातच आता जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात केएल राहुलच निरागस रूप पाहायला मिळत आहे. केएल राहुल सामन्यानंतर त्याच्या मित्राच्या म्हणजेच करुण नायरच्या खांद्यावर डोकं ठेवत शांत डोळे बंद करून बसलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे करुणचं असं केएल राहुलसाठी किती महत्वाचं आहे हे स्पष्ट होत आहे.