धवन म्हणतो 'पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही'
शिखर धवनने सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत पाकिस्तानविरुद्धच्या मॅचेसमध्ये भाग न घेण्याचा निर्णय स्पष्ट केला. यामागे एप्रिलमध्ये पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला हे प्रमुख कारण असल्याचं त्याने नमूद केलं. धवनसोबतच हरभजन सिंग, सुरेश रैना आणि युसूफ पठाण यांसारख्या इतर भारतीय खेळाडूंनीही पाकिस्तानविरुद्धची मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
देशापेक्षा मोठे काहीही नाही - शिखर धवन
शिखर धवनने त्याच्या निवेदनात म्हटलं आहे की, "मी 11 मे रोजी उचललेल्या पावलावर अजूनही ठाम आहे. माझा देश माझ्यासाठी सर्वकाही आहे आणि माझ्या देशापेक्षा मोठे काहीही नाही." भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सध्याची भू-राजकीय परिस्थिती आणि तणाव पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचं धवन आणि त्याच्या टीमने कळवलं आहे. त्यानंतर आता सामनाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मॅच अधिकृतपणे रद्द
दरम्यान, भारतीय खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे WCL आयोजकांनी भारत-पाकिस्तान मॅच अधिकृतपणे रद्द केली आहे. त्यांनी चाहत्यांच्या भावना दुखावल्याबद्दल माफीही मागितली आहे. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि भारतीय लेजेंड्सनाही अस्वस्थता जाणवली. या पार्श्वभूमीवर मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, असं आयोजकांकडून सांगण्यात आलंय.