TRENDING:

Designated Hitter Rule : क्रिकेटमध्ये येणार नवीन नियम, हिटर फलंदाज फक्त बॅटींगच करणार,मग फिल्डींगच काय? खेळाचं स्वरूपच बदलणार

Last Updated:

क्रिकेट हा जगातला सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ प्रेक्षकांना अक्षरश खिळवून ठेवतो.त्यामुळे या खेळाचा चाहतावर्ग वेगळा आता आहे. आता या खेळात आणखी रोमांच आणण्यासाठी कधी नियम तर कधी खेळाचे स्वरूप बदलले जातात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Designated Hitter and Designated Fielder Rule : क्रिकेट हा जगातला सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. हा खेळ प्रेक्षकांना अक्षरश खिळवून ठेवतो.त्यामुळे या खेळाचा चाहतावर्ग वेगळा आता आहे. आता या खेळात आणखी रोमांच आणण्यासाठी कधी नियम तर कधी खेळाचे स्वरूप बदलले जातात. आता खेळाचा हाच रोमांच वाढवण्यासाठी क्रिकेटमध्ये एक नवीन नियम येणार आहे. या नियमानुसार हिटर फलंदाज फक्त फलंदाजी करू शकणार आहे. त्यामुळे आता क्रिकेटप्रेमींना फक्त चौकार आणि षटकारांचा पाऊस पडताना पाहायला मिळणार आहे.
designated hitter rule 2026
designated hitter rule 2026
advertisement

क्रिकेटमध्ये आता संघाना "डेझिग्नेटेड हिटर" (फक्त फलंदाजी करणारा) (Designated Hitter) आणि "डेझिग्नेटेड फिल्डर" (फक्त क्षेत्ररक्षण करणारा) (Designated Fielder) निवडण्याची परवानगी असणार आहे.या नियमाचा उद्देश क्रिकेटमधील मोठ्या आणि स्फोटक फलंदाजांना लीगमध्ये जास्त काळ ठेवणे आहे, जेणेकरून ते क्षेत्ररक्षण करताना दुखापती टाळू शकतील आणि केवळ त्यांच्या फलंदाजी कौशल्यावर लक्ष केंद्रित करू शकतील.हा नियम बेसबॉलमधून आला आहे.

advertisement

नियमाचा कुणाला फायदा होईल

ज्येष्ठ खेळाडूंना या नियमाचा फायदा होईल या बदलामुळे अॅडलेड स्ट्रायकर्सचा दिग्गज फलंदाज ख्रिस लिन आणि पर्थ स्कॉर्चर्सचा स्टार मिशेल मार्श यांसारख्या खेळाडूंची कारकीर्द वाढू शकते.वयानुसार क्षेत्ररक्षणाच्या दुखापतींचा धोका वाढतो, जो या नियमामुळे कमी होईल.

हा नियम बिग बॅश लीगमध्ये अंमलात आणला जाणार आहे. तसेच या नियमामुळे ट्रॅव्हिस हेड सारख्या थकलेल्या कसोटी खेळाडूंना लीगमध्ये खेळण्यास प्रोत्साहन मिळेल. हेडने अलिकडेच अ‍ॅशेस मालिकेत चमकदार कामगिरी केली, परंतु सध्याच्या बीबीएल हंगामात तो सहभागी होत नाही.

advertisement

काही खेळाडू त्यांच्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर असतात जेव्हा ते क्षेत्ररक्षणात फारसा प्रभाव पाडू शकत नाहीत. त्यांना दुखापतीचा धोका देखील असतो. म्हणून जर हा नियम त्यांना खेळण्यास मदत करत असेल तर ते विलक्षण आहे, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाची दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉन्टिंगने दिली आहे."या नियमामुळे स्पर्धेत नवीन उत्साह निर्माण होईल. संघ त्याचा कसा वापर करतात हे पाहणे मनोरंजक असेल, असे मेलबर्न स्टार्सचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने सांगितले.

advertisement

Designated Hitter and Designated Fielder नियम काय आहे?

"डेझिग्नेटेड फिल्डर" आणि "डेझिग्नेटेड फिल्डर" दोघांनाही गोलंदाजी करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तथापि, नियुक्त क्षेत्ररक्षक विकेटकीपर बनू शकतो. जर एखाद्या संघाला हा नियम वापरायचा नसेल, तर ते त्यांच्या सामान्य प्लेइंग इलेव्हनसह खेळू शकतात.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आले दर तेजीत, गुळ आणि शेवग्याला आज काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

तसेच सध्या, महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) मध्ये हा नियम लागू केला जाणार नाही, परंतु भविष्यात त्यावर विचार केला जाईल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Designated Hitter Rule : क्रिकेटमध्ये येणार नवीन नियम, हिटर फलंदाज फक्त बॅटींगच करणार,मग फिल्डींगच काय? खेळाचं स्वरूपच बदलणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल