जय शहा यांनी एक डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत चेअरमनपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सैकिया हे बीसीसीआयचे अंतरिम सचिव म्हणून काम पाहत होते. बीसीसीआयच्या घटनेनुसार कोणत्याही रिक्तपदावर बैठक बोलवून ४५ दिवसांच्या आत ते पद भरले गेले पाहिजे. रविवार हा या मुदतीचा ४३वा दिवस होता.
फिल्डरचा प्रताप पाहून संघातील खेळाडूंवर तोंड लपवण्याची वेळ, Video
advertisement
शहा यांच्याआधी आशीष शेलार यांनी कोषाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. शेलार यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये कॅबिनेट पदाची शपथ घेतली होती.त्यानंतर त्यांनी बीसीसीआयमधील पद सोडले होते. कोषाध्यक्ष पदासाठी भाटिया यांनी अर्ज दाखल केला होता.
बीसीसीआयच्या सर्व साधारण सभेचा मुख्य अजेंडा हा या दोन पदाधिकाऱ्यांची निवड करण्याचा होता. आयसीसीचे अध्यक्ष जय शहा हे या बैठकीत विशेष आमंत्रित सदस्य म्हणून भाग घेतील. या बैठकीत अनेक राज्य संघटनेकडून त्यांचा सत्कार केला जाणार आहे. शाह यांनी गेल्या महिन्यात ग्रेग बार्कले यांच्याकडून सूत्रे हाती घेतली होती.
Video: कॅच सोडला तरी अंपायरने आऊट दिले; नॉन स्ट्रायकर फलंदाजाचा मूर्खपणा पाहा
कोण आहेत देवजीत सैकिया
आसामचे देवजीत सैकिया यांनी क्रिकेट, कायदा आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रात काम केले आहे. १९९० ते १९९१ या काळात त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४ सामने खेळले होते. या चार सामन्यात त्यांनी ५३ धावा केल्या होत्या. क्रिकेटनंतर त्यांनी कायदे क्षेत्रात काम केले. २८व्या वर्षी त्यांनी गुवाहाटी उच्च न्यायालयात सराव सुरू केला.