हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून न्यूझीलंडचा स्टार बॅटसमन डेवॉन कॉन्वे आहे. कॉन्वे मागचे चार हंगाम चेन्नई सुपर किंग्जमधून आयपीएल खेळला आहे.त्याला यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने रिटेन केले नव्हते. त्यामुळे त्याला आयपीएल 2026 लिलावात उतरावे लागले होते. डेवॉन कॉन्वेची बेस प्राईज ही 2 करोड होती. या दरम्यान त्याला कोणती तरी फ्रेंचायजी आपल्या ताफ्यात घेईल अशी अपेक्षा होती. पण त्याला संघात घेण्यासाठी कोणत्याच फ्रेचायजींनी उत्सुकता दाखवली नव्हती. त्यामुळे डेवॉन कॉन्वे प्रचंड निराश झाला होता.
advertisement
दरम्यान या लिलावानंतर दोन दिवसांनी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात आज टेस्ट सामना पार पडला. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलंडच्या टॉम लॅथमने 137 धावांची खेळी केली. तर डेवॉन कॉन्वे 178 धावांवर नाबाद खेळतो आहे. त्याच्यासोबत जेकॉब डफी 9 धावांवर खेळतो आहे. या धावांच्या1 बळावर न्यूझीलंडने पहिल्या दिवशी 1 विकेट गमावून 334 धावा केल्या आहेत.
डेवॉन कॉन्वेने ही नाबाद दीड शतकीय खेळी करून सर्व फ्रेचायजींना इशारा दिला आहे. तसेच त्यांचा निर्णय कसा चुकला आहे, हे सांगितले आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा संघ
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, एमएस धोनी, संजू सॅमसन, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नॅशनल चौधरी, प्रवीण चौधरी, ए. कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेन्री, राहुल चहर, जॅक फॉल्क्स, प्रशांत वीर.
