दुसऱ्या महिन्यातच रंगेहात पकडलं - धनश्री वर्मा
धनश्रीने खुलासा केला की तिला लग्नाच्या पहिल्याच वर्षात फसवणूक (Cheating) झाल्याचा अनुभव आला. शोमधील एका व्हायरल क्लिपमध्ये, जेव्हा को-कंटेस्टंट कुब्रा सैतने (Kubbra Sait) विचारले की, तिला रिलेशनशीप वर्क करणार नाही याची जाणीव कधी झाली? तेव्हा धनश्रीने उत्तर दिले की तिने युजवेंद्र चहलला लग्नाच्या दुसऱ्या महिन्यातच धोका देताना रंगेहात पकडलं होतं. धनश्रीचे हे बोलणे ऐकून कुब्राला मोठा धक्का बसला.
advertisement
पहिल्या वर्षातच मला जाणीव झाली की...
धनश्री म्हणाली, 'पहिल्या वर्षातच मला जाणीव झाली की, आमचं नातं जास्त दिवस टिकणार नाही. जेव्हा मी त्यांना दुसऱ्या महिन्यात चीट करताना रंगेहात पकडलं.' तिच्या या खुलाशाने प्रेक्षक आणि सोशल मीडियावर खळबळ निर्माण झाली आहे.
मी माझ्या पतीसोबत....
प्रत्येकाच्या हातात त्याची स्वतःची इज्जत असते आणि जेव्हा तुम्ही लग्नाच्या बंधनात असता, तेव्हा तुमच्यावर दुसऱ्याच्या इज्जतीची जबाबदारीही असते,' असे ती म्हणाली. 'माझ्या मनात खूप काही बोलण्याची इच्छा असूनही मी माझ्या पतीसोबत सन्मानपूर्वक वागणं चालू ठेवलं', असा दावा यापूर्वी धनश्रीने केला होता.
धनश्री चहलचा औपचारिकरित्या घटस्फोट
दरम्यान, धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केले होते. लग्नानंतर काही काळातच त्यांच्या नात्यात मतभेद असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. 2025 मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि मार्च 20 रोजी त्यांचा औपचारिकरित्या घटस्फोट झाला होता.