पाचवी ओव्हर टाकली अन्...
दिनेश कार्तिकने कुवेतविरुद्घ पाचवी ओव्हर टाकली. तोपर्यंत कुवेतने 4 ओव्हरमध्ये 51 धावा केल्या होत्या. दिनेश कार्तिकला पहिल्याच ओव्हरमध्ये एक सिक्स बसला. त्यानंतर दिनेश कार्तिकने लगेच कमबॅक केलं. दिनेश कार्तिकने दुसऱ्याच बॉलवर विकेट काढली. शेन वॉर्नसारखा बॉल दिनेश कार्तिकने टाकला अन् बॉल स्पिन झाला. बॅटरने बॉल उचलला अन् विकेटकीपर रॉबिन उथप्पा याने कोणतीही चूक केली नाही.
advertisement
पाहा Video
कुवेतचा स्को 4 ओव्हर्सनंतर 51 विकेट्सवर 4 होता, पण शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये भारतीय बॉलर्सनी 55 रन्स खर्च केले, ज्यामुळे कुवेतची टीम 106 विकेट्सवर 5 या स्कोरपर्यंत पोहोचू शकली. दिनेश कार्तिकने आपल्या ओव्हरमध्ये 23 रन्स दिले, तर प्रियांक पांचालने शेवटच्या ओव्हरमध्ये 5 सिक्ससह 32 रन्स खर्च केले.
सामना भारतीय टीमच्या हातातून गेला
लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय टीमची सुरुवात खराब झाली. रॉबिन उथप्पा (0 रन) आणि दिनेश कार्तिक (8 रन) दोघेही लवकर आऊट झाले. प्रियांक पांचाल (17 रन), अभिमन्यु मिथुन (26 रन) आणि शाहबाज नदीम (19 रन) या खेळाडूंनी बॅटने काही योगदान दिले. मिथुनने तर शेवटच्या ओव्हरमध्ये लगोपाठ 3 सिक्स मारले, परंतु तोपर्यंत सामना भारतीय टीमच्या हातातून निघून गेला होता. भारतीय टीमने पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर डीएलएस नियमानुसार 2 रन्सने विजय मिळवला होता.
