DPL 2025 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील अॅडरसन टेंडुलकर मालिका 2-2ने बरोबरीत सुटल्यानंतर आता सगळ्या क्रिकेट फॅन्सचे लक्ष दिल्ली प्रिमियर लीगवर लागले आहे.या लीगमध्ये सर्वच युवा खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतायत. या लीगमध्ये पंजाब किंग्जच्या एका छाव्याने वादळी खेळी केली आहे. त्याने 56 बॉलमध्ये 111 धावांची शतकीय खेळी केली आहे. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 9 षटकार लावले आहेत.या त्याच्या खेळीची आता क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे.
advertisement
दिल्ली प्रिमियर लीगमध्ये आज आऊटर दिल्ली वॉरियर्स आणि ईस्ट दिल्ली रायडर्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्याच पंजाब किंग्जच्या स्टार खेळाडू आणि संध्या आऊटर दिल्ली वॉरियर्सचा सलामीचा फलंदाज प्रियांश आर्याने वादळी खेळी केली होती. प्रियांश आर्याने यावेळी 56 बॉलमध्ये 111 धावांची शतकीय खेळी केली आहे. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले आहेत.198च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा काढल्या होत्या. त्याच्यासोबत करण गर्गने 43 धावा केल्या होत्या. या धावांच्या बळावर प्रथम फलंदाजी करताना आऊटर दिल्ली वॉरियर्सने 7 विकेट गमावून 231 धावा केल्या होत्या.त्यामुळे ईस्ट दिल्ली रायडर्ससमोर 232 धावांचे आव्हान होते.
प्रियांशच शतक वाया गेले
आऊटर दिल्ली वॉरियर्सने दिलेल्या 232 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ईस्ट दिल्ली रायडर्सची सूरूवात खराब झाली होती.कारण सुजल सिंह शुन्यावर बाद झाला होता. त्यानंतर सलामीवर अर्पित राणाने संघाचा डाव सावरून 79 धावांची खेळी केली होती. यानंतर अनुज रावतने संघाचा डाव सावरत 35 बॉलमध्ये 85 धावांची खेळी केली. त्यानंतर तो आऊट झाला. त्यामुळे ईस्ट दिल्ली रायडर्स हारतेय की काय असं वाटत होतं पण मयंक रावतने शेवटच्या क्षणी 12 बॉलमध्ये 32 धावा करून संघाला सामना जिंकून दिला.
ईस्ट दिल्ली रायडर्स :
सुजल सिंग, अर्पित राणा, हार्दिक शर्मा, अनुज रावत (सी आणि wk), मयंक रावत, रोहन राठी, रौनक वाघेला, नवदीप सैनी, अखिल चौधरी, आशिष मीना, रोहित यादव
आऊटर दिल्ली वॉरियर्स :
प्रियांश आर्य, सनत संगवान, मोहित पनवार, शिवम शर्मा, केशव दाबास, ध्रुव सिंग (wk), हर्ष त्यागी, सिद्धांत शर्मा (c), करण गर्ग, अंशुमन हुडा, शौर्य मलिक