पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या श्रेयस अय्यरने 28 बॉलमध्ये 25 रन केले. डावखुरा फास्ट बॉलर खलील अहमदने श्रेयस अय्यरला बोल्ड केलं. नुकत्यात झालेल्या इंग्लंड दौऱ्यामध्ये 411 रन करणारा यशस्वी जयस्वालही अपयशी ठरला. ओपनिंगला बॅटिंगला आलेल्या जयस्वालची विकेटही खलील अहमदनेच घेतली. 3 बॉलमध्ये 4 रन करून जयस्वाल माघारी परतला.
ऋतुराज गायकवाडचं खणखणीत शतक
advertisement
दुसरीकडे मागच्या काही काळापासून टीम इंडिया बाहेर असलेल्या ऋतुराज गायकवाडने दुलीप ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये खणखणीत शतक झळकावलं आहे. 131 बॉलमध्ये गायकवाडने त्याचं शतक पूर्ण केलं. गायकवाड बॅटिंगला आला तेव्हा वेस्ट झोन अडचणीमध्ये होतं, फक्त 10 रनवर त्यांनी 2 विकेट गमावल्या होत्या. गायकवाड बॅटिंगला आल्यानंतरही दुसऱ्या बाजूने विकेट जातच होत्या, पण गायकवाडने वेस्ट झोनची पडझड रोखली. इतर खेळाडूंना 40 रनचा आकडाही गाठता येत नव्हता तेव्हा गायकवाडने एकट्याने शतक ठोकलं.
मागच्या काही काळापासून ऋतुराज गायकवाड भारतीय टीममधून बाहेर आहे. ऋतुराज गायकवाडने भारताकडून शेवटचा टी-20 सामना 13 जुलै 2024 ला झिम्बाब्वेविरुद्ध खेळला, तर त्याने शेवटची वनडे 19 डिसेंबर 2023 ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली. यंदाच्या आयपीएलमध्येही ऋतुराज गायकवाड सीएसकेचा कर्णधार होता, पण दुखापतीमुळे त्याला आयपीएल अर्ध्यामध्येच सोडावी लागली होती.