खरं तर आज इंग्लंड आणि पाकिस्तान आमने सामने आले होते. या सामन्याकडे भारताचा विशेष लक्ष होतं.कारण या सामन्यात जर पाकिस्तान जिंकला असता तर पॉईटस टेबलमध्ये भारताला फायदा झाला असता.त्यामुळे सकाळपासून हरमीन प्रीतचा चेहरा खुलला होता. त्यात या सामन्यात इंग्लंडचा संघ 9 विकेट गमावून 133च धावा करू शकला होता. इंग्लंडकडून चार्लिन डिनने सर्वाधिक 33 धावा केल्या होत्या.या व्यतिरीक्त इतर खेळाडूंना फारशा धावा करता आल्या नव्हत्या.त्यामुळे इंग्लंडचा डाव 133 वर समाप्त झाला होता.पाकिस्तानकडून फातिमा सनाने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहेत. सादीया इकबालने 2, डायना बैग आणि रमीन शमीमने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
advertisement
पाकिस्तान समोर 133 धावांच सहज जिंकणार आव्हान होतं. त्यामुळे पाकिस्तान जिंकून भारताला फायदा होईल असे वाटत होते. पण पाकिस्तान 34 धावांवर खेळत असताना अचानक पाऊश पडला.त्यामुळे थोड्या वेळ सामना सूरू होण्याची वाट पाहिली, नंतर हा सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आले.त्यामुळे भारताला मोठा धक्का बसला.
पाकिस्तान आणि इंग्लंडला एक एक गुण मिळाल्याने इंग्लंड थेट पॉईटस टेबलमध्ये टॉप 1 ला पोहोचला आहे. इंग्लंडचे 4 सामन्यात 7 गुण आहेत तर नेट रनरेट +1.864 आहे. तर पाकिस्तानला 4 सामन्यात एक गुण आहेत. त्यांचा नेट रनरेट मायनस मध्ये आहे. या सामन्यात जर पाकिस्तान जिंकली असती तर इंग्लंडला मोठा धक्का बसला असता आणि भारताला मोठा दिलासा मिळाला असता.कारण भारत 4 सामन्यात 4 गुणांसह +0.682 नेट रनरेटने चौथ्या स्थानी आहे. इंग्लंड जर हा सामना हरली असती तर तिसऱ्या स्थानी घसरली असती.
दरम्यान मंगळवारच्या सामन्यात देखील जर श्रीलंका जिंकली असती तर भारताला फायदा झाला असता.श्रीलंकेने विजयासाठी न्यूझीलंडसमोर258 धावांचे लक्ष्य ठेवले होते.हे लक्ष्य गाठणे न्युझीलंडला अशक्य होते. त्यामुळे त्यांची हार होणार होती, पण सामना पावसामुळे रद्द झाला आणि दोघांना एक एक गूण देण्यात आले. आता शेवटून दुसऱ्या स्थानी आहे तर न्यूझीलंड पाचव्या स्थानी आहे.न्यूझीलंड चार सामन्यात 3 गुण आहे.त्यामुळे हा सामना श्रीलंकाने जिंकला असता तर भारताला फायदा झाला असता. पण भारताच नशीब फुटकं निघालं.