TRENDING:

सगळे IPL पाहत बसले, पण वनडेमध्ये घडला नवा इतिहास, पहिल्यांदाच चेस झाले इतके रन!

Last Updated:

भारतामध्ये सध्या आयपीएलचा धमाका सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 1 एप्रिल 2026 ही तारीख इतिहासाच्या पानावर लिहिली गेली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारतामध्ये सध्या आयपीएलचा धमाका सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडला आहे. वनडे क्रिकेटमध्ये 1 एप्रिल 2026 ही तारीख इतिहासाच्या पानावर लिहिली गेली आहे. न्यूझीलंडच्या टीमने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडेमध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. महिला वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच इतका मोठा स्कोअर चेस केला गेला आहे. न्यूझीलंडच्या टीमने हा विश्वविक्रम केला, न्यूझीलंडची स्टार बॅटर अमेलिया केरने या सामन्यात शतक ठोकलं.
सगळे IPL पाहत बसले, पण वनडेमध्ये घडला नवा इतिहास, पहिल्यांदाच चेस झाले इतके रन!
सगळे IPL पाहत बसले, पण वनडेमध्ये घडला नवा इतिहास, पहिल्यांदाच चेस झाले इतके रन!
advertisement

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला टीममध्ये वनडे सीरिज सुरू आहे. या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 346 रनचा स्कोअर केला. दक्षिण आफ्रिकेकडून एनेके बॉशने 90 बॉलमध्ये 91 रन केले, पण तिला शतक पूर्ण करता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वॉलव्हार्टने 74 बॉलमध्ये 69 रनची खेळी केली, तर क्लो ट्रायोनने शेवटच्या काही ओव्हरमध्ये जलद रन केले. क्लो ट्रायोनने 25 बॉलमध्ये 52 रन ठोकले.

advertisement

अमेलिया केरचं खणखणीत शतक

न्यूझीलंडला हा सामना जिंकण्यासाठी 347 रनचं आव्हान मिळालं. याआधी महिला वनडे क्रिकेटमध्ये कधीच एवढ्या मोठ्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला गेला नव्हता, त्यामुळे दक्षिण आफ्रिका हा सामना अगदी लगेच जिंकेल,, असं वाटत होतं, पण न्यूझीलंडची नवीन कर्णधार अमेलिया केरने दक्षिण आफ्रिकेच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं. न्यूझीलंडची ओपनर सुझी बेट्स फक्त 8 रनवर आऊट झाली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर अमेलिया केर बॅटिंगला आली. अमेलियाला दुसऱ्या बाजूने कुणीच साथ देत नव्हतं, पण तरीही ती एकटी किल्ला लढवत होती.

advertisement

अमेलियाच्या झुंजार शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने 49.4 ओव्हरमध्ये 350 रन करून हा सामना जिंकला. अमेलियाने 139 बॉलमध्ये नाबाद 179 रनची धमाकेदार खेळी केली, यात तिने एक सिक्स आणि 23 फोर लगावले. न्यूझीलंडचा विजय होत नाही तोपर्यंत एमिलिया केर खेळपट्टीवर टिकून राहिली. एमिलियाला इसाबेला गेजने साथ दिली, तिने 48 बॉलमध्ये 68 रन केले.

advertisement

महिला क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Agriculture Tips: शेतीला कीड-रोगांचा धोका, उन्हाळ्यात कशी घ्यावी काळजी? पाहा कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
सर्व पहा

याआधी महिला वनडेमध्ये सगळ्यात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा विक्रम भारतीय महिला टीमच्या नावावर होता. भारताने वनडे वर्ल्ड कपदरम्यान ऑस्ट्रेलियाने केलेल्या 338 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना 5 विकेट गमावून 341 रन केले होते. भारतीय महिला टीमचं हे रेकॉर्ड दुसऱ्या क्रमांकावर गेलं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सगळे IPL पाहत बसले, पण वनडेमध्ये घडला नवा इतिहास, पहिल्यांदाच चेस झाले इतके रन!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल