खरं तर पाकिस्तानने दिलेल्या 146 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सूरूवात खराब झाली होती. पण सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात तिलक वर्मा आणि शिवम दुबेने भारताचा विजय सोप्पा करून टाकला होता. दरम्यान सामना हातातून जात असल्याचे पाकिस्तानला कळताच त्यांनी रोहित शर्मा सारखी स्ट्रेटेजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
या टप्प्यात भारताला 12 बॉलमध्ये 17 धावांची आवश्यकता होती.त्यामुळे भारत सहज जिंकेल असे वाटत होते. त्याचवेळी पाकिस्तानचा फहीम दुखापतग्रस्त झाला होता. गोलंदाजी करताना त्याला त्रास होता. कारण दोनदा रनअप घेतल्यानंतर त्याने बॉलच टाकला नव्हता. त्यामुळे मैदानात फिजिओला बोलावले गेले आणि फहीमच्या पायाच्या दुखापतीवर उपचार सूरू झाले. या दरम्यान पाकिस्तानी खेळाडूंना स्ट्रेटेजी बनवण्यासाठी काहीसा वेळ मिळाला होता.याच वेळाचा उपयोग त्यांनी केला होता. मात्र तरी देखील पाकिस्तानला भारताविरूद्ध विजय मिळवता आलाच नाही.
रिषभ पंतची स्टाईल मारायला गेला...
2024 च्या टी20 वर्ल्ड कप सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिकेत फायनल सामना सूरू होता.हा सामना टीम इंडियाच्या हातून पुर्णत निसटला आणि टीम इंडिया पराभवाच्या उंबरठ्यावर होती.कारण दक्षिण आफ्रिकेला 30 बॉलमध्ये 30 धावा हव्या होत्या.त्यामुळे हा सामना जिंकणे अशक्यच होते.
या दरम्यान रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला आणि लगेच फिजिओला मैदानात बोलावून घेतले गेले. फिजिओने मैदानात रिषभ पंतची तपासणी सूरू केली.या तपासणीत भारताला साधारण 2-4 मिनिटे स्ट्रेटेजी ठरवण्यासाठी मिळाली. यामुळे जो दक्षिण आफ्रिका वेगाने धावा काढत होता.त्यांच्या मोमेंटमही हलला आणि भारताने डेव्हिड मिलरची विकेट काढून सामन्याचा निकाल पालटला. यासह भारताने वर्ल्ड कप जिंकला होता.
दरम्यान या विजयाच्या अनेक महिन्यानंतर रिषभ पंतने त्याला दुखापत झाली नव्हती.या उलट तो स्ट्रेटेजीचा भाग होता असे सांगितले होते.त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वातील रिषभ पंतची स्ट्रेटेजी यशस्वी ठरली होती. अशीच स्ट्रेटेजी फहीम आखत असताना पाकिस्तान तोंडावर आपटलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची नाचक्की होते आहे.