शोएब अख्तर काय बरळला?
शोएब अख्तर म्हणाला, "फखर जमान आऊट नव्हता. जर निर्णयामध्ये थोडीही शंका असेल तर त्याचा फायदा बॅटरला मिळायला हवा. पण त्यांनी फक्त दोनच अँगल पाहिले आणि त्याला बाद ठरवलं. हा एक थट्टा आहे. जर फखर मैदानात थांबला असता तर मॅचचा निकाल वेगळा असता." अख्तरने आयसीसीला सर्व 26 कॅमेऱ्यांमधील फुटेज दाखवण्याचं आव्हान दिलं.
advertisement
ग्लोव्हज बॉलच्या खाली नव्हता - अख्तर
दरम्यान, संजू सॅमसनच्या हातात जेव्हा बॉल होता, त्यावेळी बॉल स्पष्टपणे जमिनीला लागला होता. ग्लोव्हज बॉलच्या खाली नव्हताच. अंपायर्सचा निर्णय खूपच घाईचा, धक्कादायक आणि अन्यायकारक होता, असं म्हणत शोएब अख्तरने टीका केली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
दरम्यान, मॅचमध्ये पाकिस्तानची बॅटिंग सुरू असताना, तिसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर ही घटना घडली. भारतीय बॉलर हार्दिक पांड्याने टाकलेला बॉल फखर जमानच्या बॅटला लागला आणि विकेटकीपर संजू सॅमसनच्या हातात गेला. सॅमसनने जोरदार अपील केली आणि अंपायरने फखरला बाद ठरवले. फखरला मात्र विश्वास होता की बॉल बॅटला लागण्याआधी जमिनीला लागला होता. हा निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवण्यात आला. थर्ड अंपायरने अनेक रिप्ले पाहिले आणि फखरला बाद ठरवले. या निर्णयामुळे फखरसह पाकिस्तानी खेळाडूंनाही धक्का बसला. मॅचनंतर शोएब अख्तरने एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना अंपायरच्या निर्णयावर तीव्र संताप व्यक्त केला.