TRENDING:

सचिनची विकेट घेणारा बॉलर अजूनही गाजवतोय मैदान, 41व्या वर्षीही बॉल नाही आग ओकतोय!

Last Updated:

सचिन तेंडुलकरची विकेट घेणारा फास्ट बॉलर वयाच्या 41 व्या वर्षीही मैदान गाजवत आहे. टी-20 स्पर्धेत या फास्ट बॉलरने मोसमातील सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : क्रिकेटमध्ये वय हा खेळाडूसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो. जसजस वय वाढत जातं, तसा खेळाडूच्या कामगिरीचा आलेखही खाली जातो, पण काही खेळाडू याला अपवाद ठरतात. 18 वर्षांपूर्वी टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरची विकेट घेणारा बॉलर अजूनही मैदान गाजवतोय. वयाच्या 41व्या वर्षी हा फास्ट बॉलर अजूनही तितकीच भेदक बॉलिंग टाकत आहे, ज्यामुळे विरोधी टीमच्या बॅटरना घाम फुटतोय.
सचिनची विकेट घेणारा बॉलर अजूनही गाजवतोय मैदान, 41व्या वर्षीही बॉल नाही आग ओकतोय!
सचिनची विकेट घेणारा बॉलर अजूनही गाजवतोय मैदान, 41व्या वर्षीही बॉल नाही आग ओकतोय!
advertisement

ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर पीटर सीडल हा 41 वर्ष आणि 40 दिवसांचा आहे, पण बिग बॅश लीगमध्ये पीटर सीडलने विक्रमी कामगिरी केली आहे. पीटर सीडल हा ऑस्ट्रेलियाची टी-20 लीग असलेल्या बीबीएलमध्ये या मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू ठरला आहे. मेलबर्न स्टारकडून खेळताना सीडलने 6 सामन्यांमध्ये 12 विकेट घेतल्या आहेत. 23 रनवर 3 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

advertisement

सचिनची विकेट घेतली

पीटर सीडलने 2008 साली मोहाली टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरची विकेट घेतली होती. यानंतर 2011-12 सालीही टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टेस्ट सीरिजमध्ये सीडलने सचिनला दोनदा आऊट केलं होतं. सीडलने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये तीनदा सचिनला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं. सीडलच्या नावावर टेस्ट क्रिकेटमध्ये 67 सामन्यांमध्ये 221 विकेट आहेत. याशिवाय त्याने 20 वनडेमध्ये 17 आणि 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 विकेट घेतल्या आहेत. स्थानिक टी-20 क्रिकेटमध्ये सीडलच्या नावावर 139 सामन्यांमध्ये 165 विकेट आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कापूस आणि तुरीच्या दरात उलथापालथ, सोयाबीनची कशी राहीली स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

पीटर सीडलची ही कामगिरी बघून ऑस्ट्रेलियाचा माजी फास्ट बॉलर जेसन गिलेस्पी याने त्याचा टी-20 वर्ल्ड कपसाठी विचार व्हावा, अशी मागणीही केली आहे. जेसन गिलेस्पीने त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये ही भूमिका मांडली आहे. 'टी-20 वर्ल्ड कपमध्ये एखाद्या फास्ट बॉलरला दुखापत झाली, तर पीटर सीडल हा चांगला पर्याय ठरू शकतो. टी-20 हा छोटा फॉरमॅट आहे, तिथे हे चालू शकतं', असं जेसन गिलेस्पी म्हणाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
सचिनची विकेट घेणारा बॉलर अजूनही गाजवतोय मैदान, 41व्या वर्षीही बॉल नाही आग ओकतोय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल