गौतम गंभीर काय म्हणाले?
भारतीय महिला संघाचे मनोबल वाढवताना गौतम गंभीर बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हणाला, संपूर्ण सपोर्ट स्टाफच्या वतीने, मी टीम इंडिया महिलांना आगामी अंतिम सामन्यासाठी शुभेच्छा देऊ इच्छितो. खेळाचा आनंद घ्या आणि निर्भय रहा. चुका करण्यास घाबरू नका. तुम्ही आधीच संपूर्ण देशाला अभिमानाने गौरवले आहे.
सूर्यकुमार यादव आणि बुमराह काय म्हणाले?
advertisement
सूर्यकुमार यादव म्हणाला , "सर्व शुभेच्छा, खेळाचा आनंद घ्या आणि स्वतःसारखे राहा." अक्षर पटेल असेही म्हणाला, "तुम्ही नेहमीच जे करत आला आहात ते करत राहा." बुमराह म्हणाला, "तुम्हाला वर्ल्ड कप फायनलमध्ये वारंवार खेळायला मिळत नाही, म्हणून या सामन्याचा आनंद घ्या. तुमचे सर्वोत्तम द्या, आणि बाकी सर्व काही व्यवस्थित होईल. काहीही वेगळे करण्याची गरज नाही." अर्शदीप सिंग म्हणाला, "ट्रॉफी इथेच आहे, आणि तुम्हाला फक्त ती उचलायची आहे." रिंकू सिंग असेही म्हणाला, "देवाची योजना! विश्वास ठेवा आणि जिंका."
जितेश शर्माने दिल्या मराठीतून खास शुभेच्छा
विदर्भाच्या वाघाने देशाच्या वाघिणींना आणि खास करून स्मृतीला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने मराठीत स्मृतीला शुभेच्छा दिल्या. तो म्हणाला, 'स्मृती तुझ्यासाठी खास शुभेच्छा, फायनलमध्ये काही चमत्कार घडवं आणि एक चांगली इनिंग खेळ, बाकी टीमलाही खूप खूप शुभेच्छा'. जितेशसह इतर खेळाडूंनीही भारतीय महिला संघाला फायनलसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
घरच्या मैदानावर पहिला विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी
भारतीय महिला संघाबद्दल बोलायचे झाले तर, भारतात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत हरमनप्रीतच्या संघाने उपांत्य फेरीत आणि नंतर अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय महिला संघ आता तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथमच ट्रॉफी जिंकून भारतीय महिला क्रिकेटचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिण्याचे ध्येय ठेवेल. दरम्यान, पहिल्यांदाच अंतिम फेरीत खेळणारा दक्षिण आफ्रिका देखील प्रथमच ट्रॉफी जिंकण्याचे ध्येय ठेवेल. आता, भारतीय महिला संघ त्यांच्याच देशात ट्रॉफी जिंकून लाखो भारतीय चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवण्याचे ध्येय ठेवेल.
