गिल आणि अभिषेक शर्मा यांनी भारताला चांगली सुरूवात करून दिली, तरी या दोघांची विकेट गेल्यानंतर मॅच फसेल असं चित्र वाटत होतं. गिलची विकेट गेल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव शून्य रनवर आऊट झाला, त्यानंतर अभिषेक शर्माही माघारी परतला, तर संजू सॅमसनलाही मैदानात संघर्ष करावा लागत होता. संजूने 17 बॉलमध्ये 13 रनची खेळी केली, ज्यात फक्त एका फोरचा समावेश होता.
advertisement
संजू सॅमसन आऊट झाला, तेव्हा भारताला 20 बॉलमध्ये 24 रनची गरज होती. तसंच हार्दिक पांड्याही नुकताच मैदानात आला होता. भारत-पाकिस्तान सामन्यातल्या तणावादरम्यानही तिलक वर्मा याने मोक्याच्या क्षणी दोन सिक्स मारल्या आणि पाकिस्तानला या सामन्यातून पूर्णपणे बाहेर काढलं. तिलक वर्माने 18 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला फहीम अश्रफच्या बॉलिंगवर सिक्स मारला. यानंतर तिलकने 19 व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर शाहिन आफ्रिदीला आणखी एक सिक्स ठोकला. पुढच्याच बॉलला फोर मारून तिलकने भारताला विजय मिळवून दिला.
तिलक वर्माने 19 बॉलमध्ये नाबाद 30 रन केले, ज्यामध्ये 2 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. अभिषेक आणि गिलच्या आक्रमक सुरूवातीनंतरही टीम इंडियाची मिडल ऑर्डर दुबईच्या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसत होती, पण तरीही तिलक वर्माने एका बाजूने किल्ला लढवला ज्यामुळे भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला.