मेजर लीग क्रिकेटमध्ये वॉशिंग्टन फ्रिडमचा कर्णधार असलेल्या ग्लेन मॅक्सवेलने लॉस एंजल्स नाईट रायडर्स विरूद्ध वादळी खेळी केली आहे. मॅक्सवेलने 49 बॉलमध्ये 106 धावांची नाबाद खेळी केली आहे. या खेळीत त्याने 13 चौकार आणि 2 षटकार लगावले आहेत. या दरम्यान मॅक्सवेलचा स्ट्राईक रेट हा 216.33 इतका होता.
मॅक्सवेलने ही वादळी खेळी करून अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.मॅक्सवेलचं ही टी20 मधलं 8 वे शतक होतं. त्यामुळे अशाप्रकारे मॅक्सवेलने सर्वांधिक शतक मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्माची बरोबरी केली आहे.रोहित शर्माने देखील टी20 क्रिकेटमध्ये 8 शतक ठोकली होती.
टी20 मध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज
22 – ख्रिस गेल (455 डाव)
11 – बाबर आझम (309 डाव)
9 – रिली रोसो (363डाव)
9 – विराट कोहली (397 डाव)
8 – मायकेल क्लिंगर (198 डाव)
8– आरोन फिंच (380 डाव)
8 – डेव्हिड वॉर्नर (411 डाव)
8 – जोस बटलर (425 डाव)
8* – ग्लेन मॅक्सवेल (440 डाव)
8 – रोहित शर्मा (450 डाव)
तसेच ऑस्ट्रेलिया संघाकडून सर्वाधिक शतक झळकावण्याच्या यादीत मॅक्सवेलने डेविड वॉर्नर आणि अॅरोन फिंचची बरोबरी केली आहे.मॅक्सवेल सोबत डेविड वॉर्नर आणि अॅरोन फिंचच्या नावावर आठ शतकं आहेत. यासोबत मॅक्सवेल टी20 क्रिकेटमध्ये 10 हजार 500 धावांचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला आहे. तसेच त्याच्या नावावल टी20 मध्ये 178 विकेट देखील आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियन खेळाडू 10 हजार 500 धावांसह 170 विकेटआणि पाच पेक्षा अधिक शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
लीगमध्ये नंबर 6 वर सर्वांधिक खेळी करणारे खेळाडू
ग्लेन मॅक्सवेल - 106*
कोरी अँडरसन - 59*
झेवियर बार्टलेट - 59*
हसन खान - 57
जोशुआ ट्रॉम्प - 57
कसा रंगला सामना
फलंदाजीदरम्यान मॅक्सवेलने पहिल्या 15 चेंडूत 11 धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर मॅक्सवेलने पुढील 34 चेंडूत 95 धावा करून चाहत्यांची मने जिंकली. ग्लेन मॅक्सवेलच्या खेळीच्या जोरावर वॉशिंग्टन फ्रीडमने 20 षटकांत 5 गडी बाद 208 धावा केल्या, त्यानंतर लॉस एंजेलिस नाईट रायडर्स संघ लक्ष्याचा पाठलाग करताना 16.3 षटकांत फक्त 95धावाच करू शकला.वॉशिंग्टन फ्रीडम संघ हा सामना 113 धावांनी जिंकण्यात यशस्वी झाला. मॅक्सवेलला त्याच्या वादळी खेळीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला.