मिडिया रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. या फेरबदलात अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान मिळणार आहे. तर काही विद्यामान मंत्र्यांना पदोन्नती मिळणार आहे. या नवीन मंत्र्यांमध्ये रविंद्र जडेजाची बायको रिबावा जडेजा हिच्या नावाचाही समावेश आहे.त्यामुळे तिला देखील मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळ फेरबदलात रिबावा जडेजाचे नाव प्रचंड चर्चेत आहे. जामनगर मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर त्या विजयी झाल्या आहेत.रिबावा महिला सक्षमीकरण आणि सामाजिक विषयावर त्यांच्या थेट आणि स्पष्ट भूमिकेसाठी ओळखल्या जातात.त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास भाजप महिला मतदार आणि तरूण वर्गात संदेश देण्याचा प्रयत्न करेल,असे राजकीय तज्ञ बोलतायत.
advertisement
कोणाला मिळणार संधी?
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, नाव न सांगण्याच्या अटीवर या नेत्याने सांगितले की, आगामी मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलात सध्याच्या मंत्रिमंडळातील जवळपास निम्म्या मंत्र्यांची बदली होण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह 17 मंत्री आहेत. त्यापैकी आठ कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत.
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी यांची गुजरातच्या नेत्यांसोबत सुमारे पाच तास बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळात मोठा बदल होऊ शकतो. मंत्रिमंडळात 10 नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभेचे अध्यक्ष शंकरभाई चौधरी यांना सरकारमध्ये मोठी जबाबदारी देण्याची चर्चा आहे. या मंत्रिमंडळात दोन महिला नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा आहे, ज्यात क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी आमदार रिवाबा जडेजा यांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेसमधून भाजपमध्ये सामील झाल्यानंतर आमदार झालेले अर्जुन मोधवाडिया आणि सीजे चावडा हे देखील मंत्री होण्याची शक्यता आहे.