TRENDING:

Hardik Pandya : वर्ल्ड चॅम्पियन होऊन झाले 4 दिवस, टीम इंडिया भारतात परतण्याआधीच हार्दिक पांड्याला मिळाली गुड न्यूज

Last Updated:

भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवण्यात ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताला वर्ल्ड कप जिंकवून दिल्यानंतर 4 दिवसांनी हार्दिकला गुड न्यूज मिळाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवण्यात ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताला वर्ल्ड कप जिंकवून दिल्यानंतर 4 दिवसांनी हार्दिकला गुड न्यूज मिळाली आहे. आयसीसीने हार्दिक पांड्याला ही खूशखबर दिली आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर आयसीसीने टी-20च्या क्रमवारीची घोषणा केली आहे, यात ऑलराऊंडरच्या यादीत हार्दिक पांड्या पहिल्या क्रमांकावर आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्याने धमाकेदार कामगिरी केली होती.
वर्ल्ड चॅम्पियन होऊन झाले 4 दिवस, टीम इंडिया भारतात परतण्याआधीच हार्दिक पांड्याला मिळाली गुड न्यूज
वर्ल्ड चॅम्पियन होऊन झाले 4 दिवस, टीम इंडिया भारतात परतण्याआधीच हार्दिक पांड्याला मिळाली गुड न्यूज
advertisement

बॅटिंगसह बॉलिंगमध्येही हार्दिक पांड्याने उल्लेखनीय कामगिरी केली, याचा फायदा त्याला आयसीसी क्रमवारीमध्येही झाला. याचसोबत हार्दिकने इतिहासही घडवला आहे. ऑलराऊंडरच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर जाणारा हार्दिक पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

ऑलराऊंडरच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या दोन स्थान वर आला आहे. 222 रेटिंग पॉईंट्ससह हार्दिक पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. हार्दिक पांड्यासोबत श्रीलंकेचा ऑलराऊंडर वानिंदु हसरंगाही आहे, हार्दिक आणि हसरंगाचे रेटिंग पॉईंट्स समान असल्यामुळे दोघंही पहिल्या क्रमांकावर आहेत.

advertisement

टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हार्दिकने मोक्याच्या क्षणी दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या होत्या. हार्दिकने पहिले हेनरिक क्लासेन आणि मग डेव्हिड मिलरला आऊट केलं, त्यामुळे भारताने विजयापर्यंत मजल मारली.

हार्दिकने वर्ल्ड कपमध्ये बॉलिंगसह बॅटिंगमध्येही धमाका केला. त्याने 150 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 144 रन केले याचसोबत त्याने 11 विकेटही घेतल्या. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 16 रनची गरज होती, तेव्हा कर्णधार रोहित शर्माने हार्दिकला बॉलिंग दिली. ओव्हरच्या पहिल्याच बॉलला हार्दिकने डेव्हिड मिलरची विकेट घेतली, त्यामुळे भारताचा विजय सोपा झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये हार्दिकने फक्त 8 रन दिल्या आणि भारताला चॅम्पियन बनवलं.

advertisement

मागच्या वर्षी झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये हार्दिक पांड्या खेळला होता, पण दुखापतीमुळे त्याला स्पर्धेच्या मध्यातूनच बाहेर व्हावं लागलं होतं. आयपीएलच्या 17व्या मोसमातही हार्दिकची कामगिरी निराशाजनक झाली होती. यानंतर हार्दिकने टी-20 वर्ल्ड कपमध्ये दणक्यात पुनरागमन केलं.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Hardik Pandya : वर्ल्ड चॅम्पियन होऊन झाले 4 दिवस, टीम इंडिया भारतात परतण्याआधीच हार्दिक पांड्याला मिळाली गुड न्यूज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल