दुबई: भारताने आशिया कपच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करून विक्रमी नववे विजेतेपद मिळवले. फायनल मॅचमध्ये भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकने दमदार सुरूवात केल्यानंतर भारताच्या फिरकीपटूंनी अखेरच्या ८ ओव्हरमध्ये मॅच फिरवली आणि पाकला फक्त १४६ धावांवर रोखले.
advertisement
विजयासाठी १४७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात आलेल्या भारताची सुरूवात खुप खराब झाली. आघाडीच्या एकाही फलंदाजाला धावा करता आल्या नाही. त्याच बरोबर टीम इंडियाने सातत्याने विकेट देखील गमावल्या. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या लढती भारताने बाजी मारील. आणि या विजयाचा हिरो ठरला तो तिलक वर्मा होय, ज्याने ५३ चेंडूत नाबाद ६९ धावा केल्या.
भारताला अखेरच्या षटकात १० धावांची गरज होती. अशा वेळी पाकिस्तानच्या कर्णधाराने एक मोठी चूक केली. त्याने अखेरची ओव्हर हरिस राऊफकडे दिली. ज्याची धुलाई भारताने याआधीच्या अनेक सामन्यात केली होती. राऊफ गोलंदाजीला येण्याआधी पाकिस्तानला आणखी एक झटका बसला तो म्हणजे त्यांना slow over-rateचा दंड झाला. ज्यामुळे एक खेळाडू सीमारेषेवरून हटवावा लागला.