India vs Pakistan : आशिया कपच्या सुपर 4 सामन्यात भारताने 6 विकेट राखून पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव केला होता. या सामन्या दरम्यान पाकिस्तान खेळाडूंनी वादग्रस्त सेलीब्रेशन केलं होतं. साहिबजादा फरहानने एके 47 ची अॅक्शन केली होती. तर हॅरीस रौफने 6-0 अशी वादग्रस्त अॅक्शन केली होती. पाकिस्तानच्या खेळाडूंच्या या कृतीवरून वाद पेटला असतानाच आता हॅरीस रौफच्या बायकोने वादग्रस्त पोस्ट केली होती. ही पोस्ट पाहून भारतीच्या तळपायाची आग मस्तकात जाते आहे.त्यामुळे हॅरीस रौफच्या बायकोच्या पोस्टमध्ये नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.
advertisement
भारताविरूद्ध पाकिस्तानच्या या पराभवानंतर आता हॅरीस रौफच्या बायकोने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये तीने या हायव्होल्टेज सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सामना हरलो असू, पण लढाई आम्ही जिंकली आहे,अशी वादग्रस्त पोस्ट तिने केली आहे. हॅरीसची बायको या पोस्टमधून सांगते की मॅच हरलो पण युद्धातली लढाई जिंकलो,असाच होतोय. त्यामुळे या पोस्टनंतर आणखी वाद पेटण्याची शक्यता आहे.
फक्त पराभव नाही पाकिस्तानला 440 व्होल्टचा झटका, थेट Asia Cup मधून होणार OUT?
खरं तर भारताविरूद्धच्या सामन्यात हॅरीस रौफ बेफाम सुटला होता.पहिल्यांदा त्याचा टीम इंडियाचा सलामीवर अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलसोबत मैदानात राडा झाला.या राड्यानंतर त्याने मैदानात एअर फायटर प्लेनचा स्फोट होतो, अशी वादग्रस्त अॅक्शन केली होती.या सोबत मैदानात 6-0 अशी अॅक्शन करतानाही दिसला आहे. पाकिस्तान भारताचे सहा फायटर प्लेन उडवल्याचा दावा केला होता. या दाव्यातून हॅरीस रौफने 6-0 ची अॅक्शन केली होती.
हॅरीस रौफसोबत साहिबजादा फरहानने देखील अर्धशतक ठोकल्यानंतर मैदनात Ak 47 ची अॅक्शन केली होती. फरहानने शतक ठोकल्यानंतर बॅटीला गन सारखे पकडत गोळीबार करत असल्याची अॅक्शन केली होती. पाकिस्तानी खेळाडूंच्या या वादग्रस्त अॅक्शन नंतर कारवाईची मागणी जोर धरते आहे.
कसा रंगला सामना
पाकिस्तानने दिलेलं 172 रनचं आव्हान टीम इंडियाने 18.5 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केलं. अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल हे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. अभिषेक शर्माने 39 बॉलमध्ये 74 रन केले. 189.74 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत अभिषेकने 6 फोर आणि 5 सिक्स लगावल्या. तर शुभमन गिलने 167.86 च्या स्ट्राईक रेटने 28 बॉलमध्ये 47 रन केले. गिलने त्याच्या खेळीमध्ये 8 तडाखेबंद फोर मारल्या. तिलक वर्माने 19 बॉलमध्ये नाबाद 30 आणि हार्दिक पांड्याने नाबाद 7 रन केले.
गिल आणि अभिषेक यांच्यात 9.5 ओव्हरमध्येच 105 रनची पार्टनरशीप झाली. या दोघांच्या पार्टनरशीपनंतर मात्र टीम इंडियाच्या बॅटिंगला थोडा संघर्ष करावा लागला. सूर्यकुमार यादव 0 रनवर तर संजू सॅमसन 17 बॉलमध्ये 13 रन करून आऊट झाला. पाकिस्तानकडून हारिस राऊफला 2, अबरार अहमद-फहीम अश्रफला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताने पाकिस्तानला 20 ओव्हरमध्ये 171/5 वर रोखलं. पाकिस्तानकडून साहिबझादा फरहानने 45 बॉलमध्ये 58 रन केले. तर फहीम अश्रफने 8 बॉलमध्ये नाबाद 21 रन करून पाकिस्तानला 170 च्या पुढे नेलं. भारताकडून शिवम दुबेला 2 विकेट मिळाल्या, याशिवाय कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याला 1-1 विकेट घेण्यात यश आलं.