शेवटच्या 5-6 ओव्हर आमच्यासाठी... - हरमनप्रीत कौर
सामन्यात पराभव झाल्याने खूप वाईट वाटत आहे, कारण संघाने खूप कठोर परिश्रम घेतले होते आणि शेवटपर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थित सुरू होत्या. पण, शेवटच्या 5-6 ओव्हर आमच्या नियोजनानुसार गेल्या नाहीत, हे सर्वात वाईट आहे आणि हा वाईट क्षण आहे, असे हरमनप्रीत म्हणाली. आम्ही चांगला क्रिकेट खेळत आहोत, हार मानलेली नाही, पण आता आम्हाला विजयरेषा ओलांडावी लागेल, कारण गेल्या तीन मॅचमध्ये आम्ही चांगला क्रिकेट खेळूनही दुर्दैवाने पराभूत झालो. पुढील सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा असून, आम्ही ती विजयरेषा ओलांडू अशी आशा हरमनप्रीत कौरने व्यक्त केली आहे.
advertisement
आमच्यासाठी प्लस पॉईंट म्हणजे...
नॅट आणि हेदर बॅटिंग करत असताना त्या खूप चांगल्या दिसत होत्या, तरीही आमच्या बॉलर्सनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांना 300 हून कमी स्कोरमध्ये रोखता आले, हा आमच्यासाठी प्लस पॉईंट होता. कारण ही पीच आणि हे ग्राऊंड खूप वेगवान आहे आणि आम्ही चेस करू शकतो, म्हणूनच आम्ही प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आम्ही बऱ्याच गोष्टी योग्य केल्या, पण पुन्हा एकदा शेवटच्या पाच ओव्हरबद्दल संघाला एकत्र बसून विचार करावा लागेल, असं म्हणत तिने डेथ बॉलर्सला वॉर्निंग दिली आहे.
आम्ही चांगला क्रिकेट खेळलोय....- हरमनप्रीत
दरम्यान, स्मृती आणि मी बॅटिंग करत असताना सर्व गोष्टी नियंत्रणात होत्या. रिचा, अमनजोत आणि दीप्ती यांनी यापूर्वीही आम्हाला सामने जिंकून दिले आहेत, पण आज आम्ही ते करू शकलो नाही, हे दुर्दैवी आहे. हा सामना आमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा होता. आम्ही चांगला क्रिकेट खेळलो आणि कोणालाही विजय सहज मिळवू दिला नाही, असे तिने शेवटी नमूद केले. आता पुढील सामना खूप महत्त्वाचा असून, तो आमच्या बाजूने जाईल, अशी अपेक्षा हरमनप्रीतने व्यक्त केली आहे.