खरं तर टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृ्त्वाखाली नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर साऊथ आफ्रिकेचा पराभव करत पहिल्यांदा आयसीसी वुमेन्स वर्ल्ड कपवर नाव कोरलं. भारताच्या या ऐतिहासिक विजयाची सध्या संपूर्ण देशभर आणि विदेशात देखील चर्चा आहे. विशेष म्हणजे या विजयाला तीन दिवस उलटून गेले आहेत, मात्र तरी देखील या चर्चा थांबायचं नाव घेत नाही आहेत.
advertisement
आता 2025 चा वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी, भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने ट्रॉफीचा टॅटू काढला आहे.या ट्रॉफीसोबत तिने 2025 आणि 52 हे आकडे देखील लिहले आहे. आज बुधवारी हरमनप्रीतने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर टॅटूचा फोटो शेअर केला.हा टॅटूचा फोटो शेअर करताना हरमनप्रीतने कॅप्शनमध्ये लिहिले की, "तू माझ्या त्वचेवर आणि हृदयात कायमचा कोरला गेला आहेस. मी पहिल्या दिवसापासून तुझी वाट पाहत आहे आणि आता मी तुला रोज सकाळी भेटेन आणि कृतज्ञ राहीन."
दरम्यान या टॅटूमध्ये हरमनप्रीतने वर्ल्ड कप का काढला हे आपल्याला कळालचं असेल. पण 2025 आणि 52 या दोन आकड्यांचं कोडं सुटत नाही आहे. तर 2025 म्हणजे कदाचित 2025 साली भारताच्या महिला संघाने वुमेन्स वर्ल्डकप जिंकला. त्यामुळे वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत ते वर्ष ही आयुष्यभर लक्षात रहावे यासाठी तिने 2025 हा अंक देखील कोरला आहे.यासोबत 52 या अंकाचा अर्थ काय? असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर भारताने वर्ल्ड कप फायनलमध्ये 52 धावांनी साऊथ आफ्रिकेचा पराभव केला होता.त्यामुळे फायनलचा हा ऐतिहासिक विजय लक्षात राहण्यासाठी हरमनने 52 अंक देखील कोरला आहे.
हरमनप्रीत कौरसोबत स्मृती मानधनाने देखील असाच टॅटू कोरला आहे.दोघींच्या या टॅटूची सोशल मीडियावर चर्चा आहे.
