नेमकं काय संभाषण झालं?
तुझी टेस्ट क्रिकेटमधली फास्टेस्ट सेंच्युरी कोणती आहे? असा सवाल हॅरी ब्रुकने ऋषभला विचारला. त्यावेळी ऋषभने थोडा विचार केला आणि 80 ते 90 मिनिटात केली असेल, असं ऋषभ म्हणतो. त्यावरून ब्रुकने ऋषभला डिवचलं. मी माझी फास्टेस्ट सेंच्युरी 55 बॉलमध्ये केली होती. तू आज तो रेकॉर्ड मोडू शकतो, असं ब्रुक पंतला म्हणाला. हा ठीक आहे पण सगळे इनिंग रेकॉर्डसाठी करायच्या नसतात. ठीक आहे, मला विक्रमांची फार हाव नाही. जेव्हा होईल तेव्हा होईल, असं ऋषभ पंत हॅरी ब्रुकला म्हणताना दिसतोय.
advertisement
पाहा Video
दरम्यान, हा संवाद कोणत्याही प्रकारच्या स्लेजिंगचा भाग नसून, दोन खेळाडूंदरम्यानचा मैदानातील मैत्रीपूर्ण आणि मजेशीर क्षण होता. दोघांनीही एकमेकांबद्दल आदर दाखवत केलेला हा संवाद क्रिकेट चाहत्यांना खूप आवडला आहे. ऋषभ पंतने विनम्रपणे दिलेले उत्तर विशेषतः अनेकांनी पसंत केलंय.
टीम इंडियाने पहिल्या डावात 587 धावा केल्या. त्यानंतर भारताने इंग्लंडला पहिल्या डावात 407 धावांवर गुंडाळून 180 रन्सची लीड मिळवली. भारताने दुसरा डाव हा 83 षटकांमध्ये 6 बाद 427 धावांवर घोषित केला. भारताने अशाप्रकारे इंग्लंडसमोर 608 धावांचं आव्हान ठेवलं. टीम इंडियासाठी दुसऱ्या डावात कर्णधार शुबमन गिल याने सर्वाधिक 161 धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने नाबाद 69 धावा केल्या. ऋषभ पंत याने 65 रन्स जोडल्या.