SRH vs RCB 2024 : हो, त्या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर, सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी केली आणि ट्रॅव्हिस हेडच्या झंझावाती शतकाच्या जोरावर निर्धारित 20 षटकांत फक्त ३ गडी गमावून 287 धावा केल्या. हेडने 41 चेंडूत 8 चौकार आणि 9 गगनचुंबी षटकारांच्या मदतीने 102 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय हेनरिक क्लासेनने 31 चेंडूत 67 धावा केल्या. या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली यांनी शानदार सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 6.2 षटकांत 80 धावांची भागीदारी झाली. कोहलीची विकेट पडल्यानंतर, आरसीबीची गाडी अचानक थांबली.
advertisement
80 धावांवर 1 विकेट गमावल्यानंतर, आरसीबीचा अर्धा संघ 10 षटकांत 122 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. तेव्हा असे वाटले की यजमान संघ 200 धावांचा टप्पा गाठू शकणार नाही. पण त्यानंतर दिनेश कार्तिकने त्याच्या टी-20 कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळला आणि 35 चेंडूत 83 धावा केल्या. एका क्षणाकरिता कार्तिकने हैदराबादच्या हृदयाचे ठोके वाढवले होते, पण तो आरसीबीला विजय मिळवून देऊ शकला नाही. बंगळुरू संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 262 धावा केल्या. यासह, सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकत्रितपणे टी-20 क्रिकेटच्या इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक 549 धावा केल्या.