आयसीसीमधलं रँकिंग उच्च असल्याने टीम इंडियाला थेट क्वार्टर फायनलमध्ये एंट्री मिळाली होती. आता भारतीय टीम 2 मॅचेस जिंकून गोल्ड मेडलही प्राप्त करू शकते. टीम इंडिया पहिल्यांदा आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेत आहे. त्याआधी भारतीय महिलांची टीम थेट क्वार्टर फायनलमध्ये खेळली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली खेळणारी महिला टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. आता पुरुष टीम काय करते ते पाहायचं.
advertisement
क्वार्टर फायनल मॅचमध्ये भारताने यशस्वी जैस्वालची शतकी खेळी आणि लेगस्पिनर रवी बिश्नोईच्या शानदार बॉलिंगच्या आधारे विजय प्राप्त केला. जैस्वालने 49 बॉल्सच्या खेळीत 8 बाउंड्रीज आणि 7 सिक्सर्सच्या साह्याने 100 रन्स केले. भारताने 4 विकेट्स गमावून 202 रन्स केल्यानंतर नेपाळच्या टीमला 9 विकेट्स आणि 179 रन्सवर रोखण्यात भारताला यश आलं. त्यामुळे भारतीय टीमने सेमी-फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.
जैस्वालने कॅप्टन ऋतुराज गायकवाडसह (25 रन्स) 59 बॉल्समध्ये 103 रन्सची भागीदारी करून टीमला चांगली सुरुवात करून दिली. शिवम दुबे (नाबाद 25) आणि रिंकू सिंग (नाबाद 37) यांनी पाचव्या विकेटसाठी 22 बॉल्समध्ये 52 रन्सची भागीदारी केली आणि टीमचा स्कोअर 200च्या पलीकडे नेला. रिंकूने दोन बाउंड्रीज आणि 4 सिक्सर्स ठोकले, तर दुबेने 2 बाउंड्रीज आणि एक सिक्सर ठोकला.
उद्दिष्टाचा पाठलाग करताना नेपाळची टीम 13व्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 120 रन्ससह चांगल्या स्थितीत होती. बिश्नोईने धोकादायक ठरू शकणारा बॅट्समन दीपेंद्रसिंह ऐरी (15 बॉल्समध्ये 32 रन्स) आणि अर्शदीपने संदीप जोरा (12 बॉल्समध्ये 29 रन्स) यांना आउट करून मॅच भारताच्या बाजूने फिरवली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 20 बॉल्समध्ये 45 रन्स करून भारतीय टीमला चिंतेत टाकलं होतं. बिश्नोईने 4 ओव्हर्समध्ये 24 रन्स देऊन 3 विकेट्स घेतल्या. पदार्पणाची मॅच असलेला डावखुरा स्पिनर किशोर याने 4 ओव्हर्समध्ये 25 रन्स देऊन एक विकेट घेतली.