जमुई : नुकतीच जगातील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा मानली जाणारी ऑलिम्पिक स्पर्धा संपली. यामध्ये जगभरातील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेतला होता. पण भारताचा विचार केला असता यामध्ये एकही खेळाडूने सुवर्णपदक जिंकले नाही. पण ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला किती पैसे मिळतात, त्यांना भारत सरकारच्या वतीने काय सुविधा दिल्या जातात, अनेकांना हे प्रश्न पडतात. आज आपण याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
advertisement
ओलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूनला आयओसी च्या वतीने कोणताही आर्थिक पुरस्कार दिला जात नाही. तर सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला भारत सरकार बक्षिसाची रक्कम देते. तसेच इतरही अनेक सुविधा दिल्या जातात. जैवलिन थ्रोमध्ये राष्ट्रीय पदक विजेते आणि प्रशिक्षक आशुतोष कुमार सिंग यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली.
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, ओलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणे हे कोणत्याही खेळाडूसाठी ही अत्यंत सन्मानाची बाब असते. त्यामुळे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या वतीने मोठे पुरस्कार आणि बक्षीसही दिले जाते. भारतात ऑलिम्पिक विजेत्यांना करोडो रुपयांची रोख रक्कम दिली जाते. केंद्र सरकारसोबतच विविध राज्य सरकारेही त्यांच्या विजेत्यांना रोख बक्षिसे, सरकारी नोकऱ्या आणि इतर फायदे देतात.
भाडेकरार 11 महिन्यांचाच का केला जातो?, अनेकांनाही माहिती नसेल, हे आहे यामागचं महत्त्वाचं कारण
ते पुढे म्हणाले की, भारतात ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला 75 लाख ते 3 कोटी रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते. यासोबतच खेळाडूंना केंद्रात आणि राज्यात सरकारी नोकऱ्याही दिल्या जातात. यासोबतच सरकारच्या वतीने खेळाडूंना मोफत निवासस्थान, शेतजमीन आणि इतर सुविधाही दिल्या जातात. या पुरस्कारांव्यतिरिक्त, विजेत्यांना आयुष्यभर पेन्शनही दिली जाते.
आशुतोष कुमार सिंह पुढे म्हणाले की, जर एखादा खेळाडू हा ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत पदक जिंकला तर त्याला एडीएम रँकची नोकरी दिली जाते. तसेच जर कुणी दुसऱ्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत जिंकला तर त्याला राज्य सरकारमध्ये नोकरी मिळते. यासोबतच ऑलिम्पिक सारख्या मोठ्या स्पर्धेत पदक जिंकल्यावर अनेक खासगी कंपन्याही जाहिरातीसाठी खेळाडूंशी संपर्क साधतात. या माध्यमातूनही खेळाडू चांगले पैसे कमावतात. अनेक मोठे ब्रँड आणि कंपन्या त्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून खेळाडूंशी संपर्क साधतात. अशा माध्यमातून खेळाडूंचे उत्पन्न वाढते, अशी माहिती त्यांनी दिली.