21 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या सीरिजमधील पहिल्या 3 सामन्यांमध्ये तिलक खेळणार नाही. 23 वर्षांच्या तिलकला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, 'तिलक वर्मावर पोटाच्या समस्येसाठी बुधवारी, 7 जानेवारी रोजी राजकोटमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला गुरुवारी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आणि तो शुक्रवारी हैदराबादला परत जाईल, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे आणि तो बरे होत आहेत'.
advertisement
बंगालविरुद्ध विजय हजारे ट्रॉफी सामन्यात हैदराबादकडून खेळल्यानंतर तिलकने एक दिवस शस्त्रक्रिया केली. वृत्तानुसार, त्याच्यावर टेस्टिक्युलर शस्त्रक्रिया करण्यात आली. तिलकला सामन्यादरम्यान दुखापत झाली नाही, पण त्याला नंतर वेदना जाणवल्या, त्यामुळे त्याचं स्कॅनिंग करण्यात आलं, त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया केली गेली.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, 'तिलक पूर्णपणे बरा झाल्यानंतर आणि जखम भरल्यानंतर फिजिकल ट्रेनिंग पुन्हा सुरू करेल. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजमधल्या उर्वरित दोन सामन्यांसाठी तिलक खेळणार का नाही? याबद्दलचा निर्णय नंतर घेतला जाईल'.
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 वेळापत्रक
21 जानेवारी: पहिली टी-20, नागपूर
23 जानेवारी: दुसरी टी-20, रायपूर
25 जानेवारी: तिसरी टी-२०, गुवाहाटी
28 जानेवारी: चौथी टी-20, विशाखापट्टणम
31 जानेवारी: पाचवी टी-20, तिरुवनंतपुरम
तिलक टी-20 वर्ल्ड कप खेळणार का?
न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजनंतर 7 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये तिलक खेळणार का? याबद्दलचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना अमेरिकेविरुद्ध मुंबईत होईल, यानंतर 12 फेब्रुवारीला टीम इंडिया दिल्लीमध्ये नामिबियाविरुद्ध दुससा सामना खेळेल. तिलकवर छोटी शस्त्रक्रिया झाली असून तो टी-20 वर्ल्ड कपआधी टीममध्ये परतेल, अशी आशा त्याच्या कोचनी व्यक्त केली आहे. मागच्या काही काळात तिलक वर्मा भारताच्या टी-20 टीमचा महत्त्वाचा भाग बनला आहे. मिडल ऑर्डरमध्ये धमाकेदार बॅटिंग करून त्याने भारताला अनेक थरारक विजय मिळवून दिले. आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये टीम इंडिया अडचणीत असताना तिलकने टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्ध रोमांचक विजय मिळवून दिला होता.
