पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने म्हटलं की, "मी ऐकलं होतं की संघाची माजी कर्णधार मिताली राजसोबत माझं लग्न होणार आहे." शिखर धवनने जिओ सिनेमावर धवन करेंगे शोमध्ये मिताली राज सोबत नात्यासंदर्भात होत असणाऱ्या चर्चांना उत्तर दिलं. मिताली राज सध्या वुमन प्रीमियर लीगमध्ये गुजरात जायंट्सची मेंटर आहे. धवनने स्वत:च आपण असं ऐकल्याचं म्हटल्यानं त्याच्या आणि मितालीच्या लग्नाच्या अफवा होत्या हे स्पष्ट झालं.
advertisement
शिखर धवनने या शोमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतचं कौतुक केलं. ऋषभ पंत दीड वर्षानंतर अपघातातून सावरला असून मैदानावर जबरदस्त पुनरागमन केलं. त्याची टी२० वर्ल्ड कप संघातही निवड झाली. धवन म्हणाला, अपघातानंतर ज्या पद्धतीने धवनने स्वत:ला सावरलं त्याचं कौतुक करतो. त्याने सकारात्मकता आणि धैर्य दाखवलं ते जबरदस्त आहे. त्याने ज्या पद्धतीने आय़पीएल खेळलं आणि भारतीय संघात जागा मिळवली ते अविश्वसनीय आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.
आयपीएलमध्ये शिखर धवनला यंदाच्या हंगामात फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही. पंजाब किंग्जच्या संघाला पॉइंट टेबलमध्ये नवव्या स्थानावर रहावं लागलं. तर धवनने यंदाच्या हंगामात ५ सामन्यात खेळताना १५२ धावा केल्या.