टीम इंडियाला दिलासा
केएल राहुल, साई सुदर्शन आणि ध्रुव जुरेल यांची कालच वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या 2 टेस्ट मॅचच्या या सीरिजला 2 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. या सीरिजआधी टीम इंडियाच्या बॅटरनी दाखवलेला हा फॉर्म कर्णधार शुभमन गिल याच्यासाठी दिलासादायक आहे.
या सामन्यात इंडिया एचा कर्णधार ध्रुव जुरेलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर ऑस्ट्रेलिया ए ने 420 रन केल्या. जॅक एडवर्ड्सने 88 आणि 10व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मर्फीने 76 रनची खेळी केली. याशिवाय मॅकस्विनीनेही 74 रन केले. इंडिया ए कडून मानव सुथारने 5 आणि गुरनुर ब्रारने 3 विकेट घेतल्या. प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराजला 1-1 विकेट मिळाली.
advertisement
इंडिया ए चा पहिल्या इनिंगमध्ये 194 रनवरच ऑलआऊट झाला, त्यामुळे इंडिया ए या सामन्यात तब्बल 226 रननी पिछाडीवर पडली. पण भारतीय बॉलरने शानदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाचा 185 रनवर ऑलआऊट केला. मानव सुथार आणि गुरनुर ब्रारने 3-3 विकेट मिळाल्या. तर मोहम्मद सिराज आणि यश ठाकूरला 2-2 विकेट घेण्यात यश आलं. ऑस्ट्रेलियाला स्वस्तात ऑलआऊट केल्यामुळे इंडिया ए ला विजयासाठी 412 रनचं आव्हान मिळालं.