पडिक्कलशिवाय विकेट कीपर ध्रुव जुरेलने 140 रन केले. पडिक्कल आणि जुरेल यांच्यामध्ये 228 रनची पार्टनरशीप झाली, ज्यामुळे भारतीय टीम अडचणीतून बाहेर आली. याशिवाय साई सुदर्शनने 73, एन जगदीशनने 64 आणि अभिमन्यू इश्वरनने 44 रनची खेळी केली. पण कर्णधार श्रेयस अय्यर पुन्हा एकदा अपयशी ठरला. 13 बॉलमध्ये 8 रन करून अय्यर पॅव्हेलियनमध्ये परतला. याआधी दुलीप ट्रॉफीमध्येही श्रेयस अय्यरला मोठा स्कोअर करता आला नाही. दुलीप ट्रॉफीच्या दोन्ही इनिंगमध्ये श्रेयस अय्यरने 25 आणि 12 रन केले.
advertisement
दुसरीकडे ऑस्ट्रेलिया ए कडून पहिल्या इनिंगमध्ये ओपनर सॅम कॉन्सटास आणि विकेट कीपर फिलिपने शतकं केली. कॉन्सटासने 109 आणि फिलिपने नाबाद 123 रनची खेळी केली. याशिवाय कॅम्पबेल केल्लावेने 88 आणि कुपर कॉनलीने 70 रन केले. भारताकडून हर्ष दुबेने 3 आणि गुरनुर ब्रारने 2 विकेट घेतल्या. खलील अहमदला एक विकेट घेण्यात यश आलं.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी लवकरच टीम इंडियाची निवड होणार आहे. आशिया कप संपल्यानंतर लगेचच 2 ऑक्टोबरपासून भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 2 टेस्ट मॅच खेळवल्या जातील. या सीरिजसाठी श्रेयस अय्यरची तसंच देवदत्त पडिक्कलची टीम इंडियामध्ये निवड होणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. इंग्लंड दौऱ्यातील टेस्ट सीरिज आणि आशिया कपसाठी श्रेयस अय्यरची भारतीय टीममध्ये निवड झाली नव्हती, त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.