बडोद्यामधल्या पहिल्या वनडेमध्ये न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 301 रनचं आव्हान दिलं, त्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल ओपनिंगला आले. यानंतर 8व्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला झॅकरी फोक्सच्या बॉलिंगवर गिलने पॉईंटच्या दिशेने कट मारला. बुलेटच्या वेगाने हा बॉल जात असतानाच ग्लेन फिलिप्सने डाव्या बाजूला उडी मारून कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, पण फिलिप्स हवेत असतानाच त्याच्या हातातून बॉल निसटला.
advertisement
कॅच सुटल्यानंतर ग्लेन फिलिप्सने डोक्याला हात लावला, तर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनाही हसू आवरलं नाही. फिलिप्सचा कॅच पकडण्यासाठीचा हा प्रयत्न पाहून रोहित शर्मा आणि गिल अवाक झाले.
गिलचा कॅच पकडता आला नसला तरी न्यूझीलंडला पुढच्या ओव्हरमध्येच रोहित शर्माच्या रुपात यश मिळालं. काईल जेमिसनच्या बॉलिंगवर रोहित शर्मा कव्हरच्या वरून शॉट मारायला गेला, पण कर्णधार मायकल ब्रेसवेलने त्याचा कॅच पकडला. 29 बॉलमध्ये 26 रन करून रोहित पॅव्हेलियनमध्ये परतला.
न्यूझीलंडने गाठला 300 चा टप्पा
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंडने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 300 रन केल्या. न्यूझीलंडच्या 3 खेळाडूंना अर्धशतक करता आलं, पण कुणालाच शतकापर्यंत मजल मारता आली नाही. डॅरेल मिचेलने 84, हेन्री निकोल्सने 62 आणि डेवॉन कॉनवेने 56 रनची खेळी केली. भारताकडून मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर कुलदीप यादवला एक विकेट घेण्यात यश आलं.
