खंर तर टीम इंडियाचा चायनामॅन सामन्याच्या सुरूवातीपासून विकेटसाठी प्रयत्न करत होता. पण तब्बल 7 ओव्हर गोलंदाजी करून त्याला विकेटच मिळत नव्हती. शेवटी ड्रिक्स ब्रेक दरम्यान त्याची रोहित शर्माशी बातचित झाली.यामध्ये रोहित शर्मा त्याला गोलंदाजीबाबत त्याला काही सल्ले देताना दिसला.या सल्ल्यानंतर दुसऱ्याच क्षणी कुलदीप यादवने 34 व्या ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलवर ग्लेन फिलिप्सला जाळ्यात फासत त्याची विकेट घेतली होती. या विकेटनंतर विराट कोहलीने जबरदस्त सेलीब्रेशन केले होते.
advertisement
त्यामुळे रोहितने जर सल्ला दिला नसता तर कदाचित कुलदीप यादवला विकेट मिळाली नसती. त्यामुळे रोहितने ज्याप्रकारे गोलंदाजांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. तशाचप्रकारे शुभमन गिलने गोलंदाजांशी बोलणे आवश्यक आहे. तरंच खेळाडू चांगला परफॉर्म करू शकतात.
सध्या न्यूझीलंडच्या धावा 200 च्या आसपास पोहोचायला आला आहे आणि या दरम्यान त्यांच्या पाच विकेट पडल्या आहेत. आता इथून पुढे न्यूझीलंड किती धावा करते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
न्यूझीलंडची प्लेइंग इलेव्हन: डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल हे (विकेटकिपर), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झाचेरी फॉल्क्स, ख्रिश्चन क्लार्क, काइल जेमिसन आणि आदित्य अशोक.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.
