हार्दिकने पांड्याची वॉर्निंग
प्रॅक्टिस सेशनदरम्यान हार्दिक पांड्याने स्टेडियममध्ये असलेल्या चाहत्यांना बाजूला व्हायला सांगितलं, कारण हार्दिक पांड्या त्या दिशेने शॉट मारणार होता. 'ओ भइया लोग सब बैठे हो उठ जाओ', असं हार्दिक म्हणाला, त्यानंतर 'तू कुठे मारणार आहेस? नॉर्थ विंग?' असा प्रश्न गौतम गंभीरने हार्दिकला विचारला.
यानंतर हार्दिक पांड्याने नेटमध्ये आक्रमक बॅटिंग करायला सुरूवात केली. हार्दिक पांड्याचे हे शॉट कोच गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादवही पाहत राहिले. बीसीसीआयने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
advertisement
टी-20 सीरिजसाठी भारतीय टीम
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन
न्यूझीलंडची टीम
मिचेल सॅन्टनर (कर्णधार), डेवॉन कॉनवे, बेवन जेकब्स, टीम रॉबिनसन, मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, झॅक फोक्स, डॅरेल मिचेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, जेकब डफी, काइल जेमिसन, इश सोढी, मॅट हेन्री
