दुबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यात दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया कपची फायनल मॅच सुरू आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमारने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी धमाकेदार सुरूवात करून दिली. पहिल्या जोडीने 84 धावांची भागिदारी केली.
advertisement
पाकिस्तानच्या खेळाडूंनी पहिल्या 12 ओव्हरमध्ये आक्रमक फलंदाजी केली. मात्र त्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी त्यांना नाचवले. टीम इंडियाकडून 17वी ओव्हर कुलदीप यादवने टाकली आणि हीच ओव्हर संपूर्ण पाकिस्तान डाव संपवून टाकणारी ठरली.
कुलदीप यादने 17व्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतल्या. त्याने पहिल्या चेंडूवर पाकच्या कर्णधाराला माघारी पाठवले. त्यानंतर चौथ्या चेंडूवर शाहीन आफ्रीदीला बाद केले. आणि अखेरच्या चेंडूवर आणखी एक विकेट घेऊन पाकिस्तानची हवा काढून टाकली. एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेण्याची धमाकेदार कामगिरी केल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार सेलीब्रेशन केले नाही. त्याने पटकन भारतीय खेळाडूंनी पुढची ओव्हर टाकण्यास सांगितले.
सूर्याच्या या कृतीचे सर्वांना आश्चर्य वाटले. कारण जो पाकिस्तानचा संघ 200च्या जवळ पोहोचेल असे वाटत होते ते कुलदीपच्या ओव्हरमुळे 150 पर्यंत देखील पोहोचतील का अशी शंका निर्माण झाली होती. पण सूर्याला माहित होते की जर ओव्हर वेळेत पूर्ण झाल्या नाही तर अखेरच्या म्हणजे 20व्या ओव्हरमध्ये फिल्डिंगवर मर्यादा आली असती. सूर्याने हुशारी दाखवत भारतीय खेळाडूंना अलर्ट केले.
कुलदीपच्या या ओव्हनंतर पाकिस्तान संघाला संपूर्ण 20 ओव्हर देखील फलंदाजी करता आली नाही. त्यांचा 19.1 षटकात 146 धावांवर ऑलआऊट झाला.