सामना पावसामुळे रद्द झाला तर...
सुपर फोर स्टेज राउंड-रॉबिन पद्धतीने खेळवला जाईल, या राऊंडमध्ये चारही संघ एकमेकांसमोर येतील. चार टीमचे सहा सामने खेळवले जातील. या फेरीच्या शेवटी अव्वल दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. त्यामुळे स्कोअरिंग पॅटर्नमध्ये कोणताही बदल नाही, विजयासाठी दोन गुण आणि रद्द झालेल्या सामन्यासाठी एक गुण दिला जातो. त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर दोन्ही संघांना एक एक गुण दिला जाईल.
advertisement
पावसाची शक्यता किती?
21 सप्टेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 32 डिग्री तापमान असण्याची शक्यता आहे. सध्या दुबई आणि अबूधाबी येथे होणाऱ्या या स्पर्धेत पावसाची शक्यता खूप कमी आहे. तसेच हवामान देखील स्वच्छ आहे. अशातच पावसामुळे मॅच रद्द होण्याची शक्यता खूप कमी आहे. सामन्यादरम्यान 13 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात, अशी माहिती देखील आहे.
IND vs PAK पीच रिपोर्ट
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा हाय-व्होल्टेज सामना दुबईमध्ये होणार आहे, जिथे खेळपट्टी त्याच्या संथ वर्तनासाठी ओळखली जाते. दुबईच्या मैदानावर वेगवान आउटफिल्ड आहे. तथापि, मैदानाच्या मोठ्या आकारामुळे फिरकीपटूंना फोर मारणं कठीण होते. मागील सामन्यांमध्ये ड्यू हा मोठा चिंतेचा विषय नव्हता, परंतु तरीही कर्णधारांना त्यावर लक्ष ठेवावं लागेल. या पीचवर प्रथम फलंदाजी करणं फायदेशीर ठरू शकतें.
भारताचा संघ - सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रित बुमरा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा.
पाकिस्तानचा संघ - सलमान अली आगा (कॅप्टन), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हारिस रॉफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, साहिबजादा फरहान, सॅम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी आणि सुफियान मोकीम.