एएनआयशी बोलताना रिंकूचे वडील खानचंद सिंह यांनी सांगितले, माझी तर तब्येत खूप खराब होती. पण ज्यावेळेस माझ्या पोराने शेवटच्या बॉलवर चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला, तसा मी एकदम फीट झालो.काल तर माझी तब्येत खूपच खराब होती. पण आज तर एकदम ठणठणीत बरा झालो आहे. कुठलाच आजार नसल्या सारखे वाटतेय, असे रिंकु सिंहचे वडील खानचंद सिंह यांनी सांगितले.
advertisement
भारताला सामना जिंकून दिल्यानंतर रिंकु सिंहने त्याच्या वडिलांना कॉल देखील केला होता. या कॉलवर बोलताना रिंकु सिंह वडिलांना म्हणाला,पप्पा कसं वाटतंय?खूप चांगल वाटतंय,माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, असे रिंकुचे वडिलांनी त्याला फोनवर सांगितले.
मी मॅच इतके पाहत नाही पण कालचा सामना मी पुर्ण बघितला.दोन कॅच त्याने फार सुंदर घेतल्या.रिंकू सिंहच्या लहानपणीच्या आठवणीबद्दल बोलताना वडील म्हणाले की, लहानपणी घरी खेळताना थोड विचित्र वाटायचं.पण मला आता मला खूप चांगला वाटतंय.त्यामुळे त्याला मी इतकाच आर्शिवाद देईन की त्याने असंच देशाचं नाव मोठं करावं,असे त्यांनी शेवटी म्हटलं.
यासोबत रिंकु सिंहने सामन्यानंतर संजय मांजरेकर यांच्याशीही बातचीत केली होती. यावेळी रिंकु म्हणाला, मी या स्पर्धेत फक्त एकच बॉल खेळलो.पण किती बॉल खेळतो याला महत्व नाही, पण टीमसाठी कशी खेळी करता हे महत्वाचे आहे.त्यामुळे शेवटी तेच घडलं 3 बॉलमध्ये 1 धाव हवी असताना चौकार मारला. तसेच सर्वांना माहिती आहे मी फिनिशर आहे.त्यामुळे मला पुन्हा फिनिशरचा रोल करण्याची संधी मिळाली. पण एक बॉल मिळाली त्यात टीम जिंकली हे महत्वाचे आहे,असे रिंकु सांगतो.