वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं श्रीलंका आणि नेदरलँडचा पराभव केला, तर भारतीय टीमनं ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचा पराभव केलाय. आता दोन्ही टीम शनिवारी आमने-सामने येणार असून त्या जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये एकमेकांशी भिडतील. जगभरातील क्रिकेटप्रेमी या मॅचची आतुरतेनं वाट पाहत आहेत. मात्र, या मॅचमध्ये भारतीय कॅप्टन रोहित शर्मा समोर प्लेइंग 11 निवडण्याबाबत मोठा पेच असेल.
advertisement
रोहितला दोन प्रश्नांची शोधावी लागणार उत्तरं
भारतीय कॅप्टन रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्धच्या मॅचपूर्वी दोन प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील. कारण भारतीय क्रिकेट टीममधील ओपनिंग बॅट्समन शुभमन गिल डेंग्यूमधून बरा झालाय, व तो पाकिस्तानविरुद्धच्या मॅचसाठी अहमदाबादला पोहोचला आहे. तसेच त्यानं या मॅचच्या अनुषंगाने गुरुवार, 12 ऑक्टोबर 2023 रोजी नेटमध्ये सरावही केलाय. मात्र, तो मॅचसाठी फिट आहे की नाही? हे अद्याप स्पष्ट करण्यात आलं नाही. तसेच तो पाकिस्तानविरुद्ध खेळेल की नाही? याबाबत टीम मॅनेजमेंटकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही. गिल खेळणार की नाही, याचा निर्णय मेडिकल टीमकडून घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.
World Cup 2023: वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमला खरी ट्रॉफी मिळते का? काय आहे नियम?
दुसरीकडे वर्ल्ड कप स्पर्धेत गिलच्या अनुपस्थितीत ईशान किशननं भारतीय डावाची सुरुवात केली होती. तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये शून्यावर बाद झाला होता. मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये त्यानं 47 रन केले होते. लेफ्ट हँडेड बॅट्समन असल्यानं ईशान भारतीय टीममध्ये ओपनर म्हणून प्रभावी ठरू शकतो.
गिल फिट नसेल तर ईशान खेळणार
वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या पाकिस्तानच्या टीममध्ये लेफ्ट आर्म पेस बॉलर शाहीन आफ्रिदी आहे. अशा स्थितीत राइट हँडेड बॅट्समन आणि लेफ्ट हँडेड बॅट्समन हा टॉप ऑर्डरमध्ये चांगला पर्याय ठरू शकतो. कारण यामुळे बॉलर्सना त्यांची लाईन व लेंग्थ वारंवार बदलावी लागते. अशा परिस्थितीत शुभमन गिल जर फिट नसेल, तर ईशानचा भारतीय टीममध्ये समावेश होऊ शकतो. अर्थात शाहीनला पाकिस्तानच्या वर्ल्ड कप स्पर्धेत झालेल्या दोन्ही मॅचमध्ये स्वतःची छाप सोडण्यात अपयश आलंय. शाहीनची बॉलिंग श्रीलंकेविरुद्ध तर खूपच महागात पडली. त्याने 9 ओव्हरमध्ये 66 रन देत फक्त 1 विकेट घेतली. नेदरलँड्सविरुद्धही त्याला केवळ 1 विकेट घेता आली.
World Cup 2023 : पाच वेळची चॅम्पियन अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत, दक्षिण आफ्रिकेने कांगारूंना चिरडलं
शार्दुल की शमी?
भारतीय कॅप्टन रोहित शर्मासमोर पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये प्लेइंग-11 कोणती निवडावी, हा देखील प्रश्न असेल. पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये दोन पेस बॉलरसह जायचे की तीन पेस बॉलर खेळवायचे, हा प्रश्न रोहित शर्मा समोर असेल. अफगाणिस्तानविरुद्ध दिल्लीत झालेल्या मॅचमध्ये भारतीय क्रिकेट टीममध्ये तिसरा पेस बॉलर म्हणून शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली होती. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये ठाकूर ऐवजी मोहम्मद शमी हा उत्तम पर्याय असू शकतो. त्यामुळे आता कॅप्टन रोहितला ठरवावं लागेल की, शार्दुलला खेळवून टीमची बॅटिंग लाइन आणखी मजबूत करायची की टीमची बॉलिंग लाइन मजबूत करण्यासाठी शमीला खेळवायचं.
अहमदाबादमध्ये शमीचं रेकॉर्ड चांगलं
मोहम्मद शमी हा इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा अर्थात आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स टीमकडून खेळतो. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरात टायटन्स टीमचं होम ग्राउंड आहे. यावर्षी झालेल्या आयपीएल 2023 स्पर्धेत शमीनं नरेंद्र मोदी स्टेडियमवरच सर्वात जास्त विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये शमीला एकूण 28 विकेट मिळाल्या होत्या. त्यापैकी तब्बल 17 विकेट त्यानं नरेंद्र मोदी स्टेडियमवर घेतल्या होत्या. शमीला येथील मैदान आणि परिस्थिती चांगली माहीत आहे. दुसरीकडे, टीम इंडियानं शार्दुल ठाकूरला गेल्या काही मॅचमध्ये बॅटिंगसाठी संधी दिली असली, तरी तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. अशा स्थितीत शमीला पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये संधी दिली जाऊ शकते.
Cricket : क्रिकेटपटू तोंडाला क्रीम का लावतात माहितीय का? स्टाइल की आणखी काही? वाचा
पाकिस्तानविरुद्ध भारतीय क्रिकेट टीममध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे पहिल्या पसंतीचे पेस बॉलर म्हणून खेळतील. भारत या मॅचमध्ये फक्त दोन स्पिनर्ससह खेळू शकतो. अशा परिस्थितीत भारताचा स्पिनर आर अश्विनला टीममध्ये स्थान मिळण्याची शक्यता कमी आहे. पाकिस्तानविरुद्ध स्पिनर म्हणून कुलदीप यादव व रवींद्र जडेजा खेळण्याची शक्यता अधिक आहे.
पाकिस्तानविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग 11
रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन/शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.