World Cup 2023 : पाच वेळची चॅम्पियन अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत, दक्षिण आफ्रिकेने कांगारूंना चिरडलं
- Published by:Shreyas
Last Updated:
सर्वाधिक 5 वेळा वर्ल्ड कप जिंकणारी ऑस्ट्रेलियाची टीम यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे.
लखनऊ, 12 ऑक्टोबर : सर्वाधिक 5 वेळा वर्ल्ड कप जिंकणारी ऑस्ट्रेलियाची टीम यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. 2023 वर्ल्ड कपच्या लागोपाठ दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का बसला आहे. भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. लखनऊमध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तब्बल 134 रननी ऑस्ट्रेलियाला मात दिली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 312 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा 40.5 ओव्हरमध्ये 177 रनवर ऑलआऊट झाला आहे.
ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक 46 रन केले. आठव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या स्टार्कने 27 आणि नवव्या क्रमांकाच्या पॅट कमिन्सने 22 रनची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाला सर्वाधिक 3 विकेट मिळाल्या. मार्को यानसन, केशव महाराज आणि तबरेज शम्सीला प्रत्येकी 2-2 आणि लुंगी एनगिडीला 1 विकेट मिळाली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. यानंतर क्विंटन डिकॉकच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 311 रन केल्या. दक्षिण आफ्रिकेचे ओपनर क्विंटन डि कॉक आणि टेम्बा बऊमा यांच्यात 108 रनची पार्टनरशीप झाली. तर मार्करमने 56 रनची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क आणि मॅक्सवेलला 2 तर हेजलवूड, कमिन्स आणि झम्पा यांना 1-1 विकेट मिळाली.
advertisement
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या दणदणीत विजयासोबतच दक्षिण आफ्रिका पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. दोन सामन्यांमध्ये दोन विजयांसह दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 4 पॉईंट्स आहेत, तर ऑस्ट्रेलिया पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या क्रमांकावर आहे.
Location :
Lucknow,Uttar Pradesh
First Published :
October 12, 2023 10:06 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup 2023 : पाच वेळची चॅम्पियन अजूनही विजयाच्या प्रतिक्षेत, दक्षिण आफ्रिकेने कांगारूंना चिरडलं