Cricket : क्रिकेटपटू तोंडाला क्रीम का लावतात माहितीय का? स्टाइल की आणखी काही? वाचा

Last Updated:

काही खेळाडूंच्या चेहऱ्यावर पांढऱ्या रंगाच्या क्रीमचा जाड थर असतो. परंतु हे क्रीम खेळाडू चेहऱ्याला का लावतात, याचा कधी विचार केलाय का?

News18
News18
दिल्ली, 12 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अॅड्यु सायमंड्स आठवतो का? या खेळाडूची खास ओळख म्हणजे तो नेहमी त्याच्या ओठावर पांढरं क्रीम लावून खेळत असे. सध्या आयसीसी वन डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा सुरू असून क्रिकेट मॅच पाहताना तुमच्या लक्षात आलं असेल की, काही खेळाडूंच्या चेहऱ्यावर पांढऱ्या रंगाच्या क्रीमचा जाड थर असतो. परंतु हे क्रीम खेळाडू चेहऱ्याला का लावतात, याचा कधी विचार केलाय का? हे क्रीम तोंडाला, ओठावर लावण्यामागे एक खास कारण आहे.
खरं तर तुम्ही जेव्हाही एखादी क्रिकेट मॅच पाहता, तेव्हा काही क्रिकेटर्स चेहऱ्यावर पांढरं क्रीम लावून खेळत असल्याचं तुमच्या लक्षात आलचं असेल. अनेक क्रिकेटर चेहऱ्यावर तर काही ओठांवर किंवा मानेवरही क्रीम लावतात. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू अॅड्यु सायमंड्सचा क्रिकेटच्या मैदानावरचा एखादा फोटो जरी तुम्ही पाहिला, तरी तुम्हाला लक्षात येईल की, आम्ही कोणत्या क्रीमबद्दल बोलत आहोत. कारण तो अनेकदा ओठांवर क्रीम लावून खेळायचा. त्यामुळे क्रिकेटपटू कोणतं क्रीम लावतात, या क्रीमचा काय फायदा होतो, असे प्रश्न अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनात असतील. चला तर, हे क्रीम नेमकं का लावलं जातं, ते जाणून घेऊ.
advertisement
त्वचेचं संरक्षण करण्यासाठी उपयुक्त
सूर्यप्रकाशापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी हे क्रीम लावणं हा एक चांगला पर्याय मानला जातो. हे क्रीम लावल्यामुळे केवळ जळजळ होण्यापासून आराम मिळत नाही, तर सूजदेखील कमी होते. त्यामुळेच काही क्रिकेटपटू किंवा खेळाडू त्वचेची काळजी घेण्यासाठी चेहऱ्यावर हे क्रीम लावून खेळतात.
advertisement
क्रीमचं नेमकं नाव काय?
अनेकांना माहिती असेल ही एक सनस्क्रीन आहे, व सूर्यप्रकाशापासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी ते वापरलं जातं. परंतु, हे सामान्य सनस्क्रीन नाही, तर त्यापेक्षा वेगळं आहे. वृत्तानुसार, खेळाडू जे पांढऱ्या रंगाचं क्रीम लावतात, ते सामान्य सनस्क्रीनपेक्षा वेगळी असून तिला झिंक ऑक्साईड म्हणतात. हे क्रीम सूर्यापासून त्वचेवर पडणाऱ्या हानिकारक किरणांपासून वाचवतं. हे एक फिजिकल सनस्क्रीन आहे. जेव्हा खेळाडू 5-6 तास सूर्यप्रकाशात उभे असतात, तेव्हा जर हे सनस्क्रीन सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येणाऱ्या त्वचेवर लावलं, तर त्वचेचं संरक्षण होतं. क्रीममधील झिंक ऑक्साईड सूर्यप्रकाशामुळे होणारे दुष्परिणाम पूर्णपणे कमी करतं.
advertisement
दरम्यान, सध्या वन डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धा भारतात सुरू आहे. भारतामध्ये असणारं तापमान सहन न झाल्यानं अनेक परदेशी खेळाडू असं क्रीम लावून मैदानात खेळताना दिसत आहेत.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Cricket : क्रिकेटपटू तोंडाला क्रीम का लावतात माहितीय का? स्टाइल की आणखी काही? वाचा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement