नेमकं काय म्हणाला सलमान अली आगा?
आम्ही दोन्ही इनिंगची सुरूवात केली. पण अखेरीस आमच्या हातातून मॅच गेली. कुणा एका खेळाडूमुळे आम्ही हारत नाही तर आम्ही एक टीम म्हणून हारलो. हॅरिस रौफ आमच्यासाठी खास बॉलर आहे. आज त्याच्याकडून चांगली बॉलिंग झाली नाही, पण प्रत्येकासाठी खराब दिवस असतो, असं सलमान अली आगा म्हणाला. आम्हाला माहितीये की, आमची आशिया कपमध्ये चांगली कामगिरी झाली नाही, असं सलमान अली आगा म्हणाला.
advertisement
आमच्यासाठी हा टर्निंग पाईंट...
आम्ही अनेक ठिकाणी चांगली कामगिरी केली पण काही लूप होल होते. आम्ही बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये आज चांगली कामगिरी केली. पण दोन्ही वेळी आम्ही फिनिशिंग चांगली केली नाही. दोन्ही वेळी आमच्याकडे संधी होती पण आम्हाला ते जमलं नाही, त्यामुळे मला वाटतं की, आमच्यासाठी हा टर्निंग पाईंट होता, असं सलमान अली आगा म्हणाला.
हॅरिसला का बॉलिंग दिली?
अबरार आणि सॅम चांगली बॉलिंग करत असताना हॅरिसला का बॉलिंग दिली? असा सवाल सलमानला विचारला गेला. त्यावेळी त्याने आपली प्लॅनिंग सांगितली. हॅरिसने मागच्या सामन्यात चांगली कामगिरी केली म्हणून त्याला बॉलिंग दिली पण त्याला मार पडला, असं म्हणत त्याने हॅरिसवर खापर फोडलं आहे. त्यावेळी त्याला बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना मिस केलं का? असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने दोघांशिवाय आमची टीम चांगली कामगिरी करतीये, असं उत्तर दिलं.