TRENDING:

IND vs SA : '...आता तरी तुमचे डोळे उघडतील', लाजिरवाण्या पराभवानंतर गावसकर दोघांवर संतापले!

Last Updated:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी टेस्ट मॅच शनिवार 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. कोलकात्यामध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 30 रनने लाजिरवाणा पराभव झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी टेस्ट मॅच शनिवार 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. कोलकात्यामध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाचा 30 रनने लाजिरवाणा पराभव झाला. आता सीरिज वाचवण्यासाठी टीम इंडियाला गुवाहाटीमधली दुसरी टेस्ट जिंकावी लागणार आहे, पण कोलकात्यामध्ये झालेला हा पराभव टीम इंडियाला पुढची काही वर्ष त्रास देत राहिल. भारताचे महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी या पराभवानंतर खेळाडू आणि निवड समिती या दोघांवर टीकास्त्र डागलं आहे. इडन गार्डनमधील पराभव खेळाडू आणि निवड समितीसाठी डोळे उघडणारा ठरेल, असं गावसकर म्हणाले आहेत.
'...आता तरी तुमचे डोळे उघडतील', लाजिरवाण्या पराभवानंतर गावसकर दोघांवर संतापले!
'...आता तरी तुमचे डोळे उघडतील', लाजिरवाण्या पराभवानंतर गावसकर दोघांवर संतापले!
advertisement

'आशा आहे की इडन गार्डनमध्ये झालेल्या पराभवानंतर त्यांचे डोळे उघडतील जे स्थानिक क्रिकेटमध्ये मोठा स्कोअर करणाऱ्या बॅटरकडे पाहतात, जे बॉल खाली राहणाऱ्या आणि स्पिन होणाऱ्या खेळपट्टीवर खेळतात. आंतरराष्ट्रीय खेळाडू परदेशात खेळण्यात इतके व्यस्त असतात की ते घरच्या खेळपट्ट्यांवर खेळण्याचा सराव करत नाहीत. देशांतर्गत क्रिकेट खेळलात तर चांगल्या स्थितीमध्ये राहाल आणि स्पिन बॉलिंग खेळण्याचं तुमचं कौशल्यही सुधारेल', असं गावसकर म्हणाले आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात झपाट्याने बदल, मका आणि कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

'आमचे बरेच खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत. जर तुम्ही देशांतर्गत क्रिकेट खेळलात तर तुम्हाला अशा खेळपट्ट्यांवर खेळण्याची संधी मिळेल का? आता, देशांतर्गत पातळीवरही, नॉकआऊटमध्ये क्वालिफाय होण्यासाठी पॉईंट्स मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा खेळपट्टीवर बॉल थांबून येतो तसंच स्पिन होतो, पण आमचे खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नाहीत. आमचे किती खेळाडू रणजी ट्रॉफी खेळतात?' असा सवाल गावसकरांनी विचारला आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : '...आता तरी तुमचे डोळे उघडतील', लाजिरवाण्या पराभवानंतर गावसकर दोघांवर संतापले!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल