पहिला दिवसाचा खेळ संपल्यानंतर मोहम्मद सिराज म्हणाला की,नवीन चेंडू बॅटवर चांगला येत होता, पण जेव्हा चेंडू मऊ झाला तेव्हा उसळीही कमी झाली. माझी मानसिकता पूर्ण आणि स्टंपवर गोलंदाजी करण्याची होती. काही रिव्हर्स स्विंग ऑफरमध्ये होते, जर तुम्ही स्टंप-टू-स्टंप गोलंदाजी केली तर तुम्हाला विकेट घेण्याचे पर्याय मिळतील आणि फलंदाजांना धावा करणे सोपे नाही. एका टोकाला फलंदाजी करणे चांगले असते, तर दुसऱ्या टोकाला - उसळी बदलते आणि धावा करणे कठीण असते,असे सिराज म्हणाला.
advertisement
पुढे सिराजने बुमराहने दिलेल्या सल्ल्याची माहिती दिली. जस्सी भाईंनी मला सांगितले की विकेट घ्यायचा असेल तर तुला स्टंम्पवर बॉल टाकावा लागेल, असे केलंस तर तुला एलबीडब्ल्यूवर विकेट मिळेल किंवा कॅचेस जातील असे त्याने सांगितले.त्यामुळे त्याचा सल्ला मानल्यानंतर सिराजने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या होत्या.
दरम्यान मोहम्मद सिराजने डावाच्या सूरूवातीला चांगली गोलंदाजी केली होती. पण त्याला विकेटच मिळत नव्हता.मग बुमराहचा सल्ला मिळाल्यानंतर त्याने 45 व्या ओव्हरमध्ये दोन विकेट घेतल्या होत्या. सिराजने वेरीनेला एलबीडब्ल्यू तर मार्को जॅनसनला शुन्यावर बाद केले होते.अशाप्रकारे त्याने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या होत्या.
दरम्यान पहिल्या दिवशी साऊथ आफ्रिका 159 वर ऑल आऊट झाली होती.तर दिवस अखेर भारत 37 धावात 1 विकेट गमावून खेळते आहे.
कोलकाता कसोटीसाठी भारताचे प्लेइंग 11: यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
कोलकाता कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचे प्लेइंग 11: एडेन मार्कराम, रायन रिकेलटन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेन (यष्टीरक्षक), सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज
