India vs South Africa News : उद्या 14 नोव्हेंबर 2025 पासून भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात कोलकत्ताच्या ईडन गार्डन मैदानावर पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार आहे.या सामन्याआधीच मराठमोठ्या खेळाडूने शतक ठोकलं आहे. हे शतक ठोकून त्याने पुन्हा एकदा टीम इंडियात दावेदारी ठोकली आहे.त्यामुळे या दावेदारीने मुख्य कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन शुभमन गिलचं टेन्शन वाढलं आहे.
advertisement
खरं तर भारताची साऊथ आफ्रिकेसोबतची टेस्ट मालिका सुरू होण्याआधी आज भारत आणि आफ्रिकेत पहिला अनाधिकृत वनडे सामना खेळवण्यात आला होता.या सामन्यात टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाडने शतक ठोकलं आहे. या शतकाच्या बळावरच टीम इंडियाने 4 विकेटसने सामना जिंकला आहे. दरम्यान ऋतुराजच्या या शतकानंतर त्याने वनडेसाठी दावेदारी पेश केली आहे.पण रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या एंन्ट्रीनंतर त्याला टीम इंडियात कशी संधी मिळते? हे पाहावे लागणार आहे.
कसा रंगला सामना
साऊथ आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 9 विकेट गमावून 285 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे भारतासमोर 286 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताकडून ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा मैदानात उतरले होते. या दरम्यान अभिषेक शर्मा 31 धावांवर बाद झाला होता.त्याच्या मागोमाग रियान पराग 8 वर तिलक वर्मा 39 धावांवर बाद झाला होता.ईशान किशनही 17 वर बाद झाला.
एकाबाजूने भारताच्या विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने ऋतुराज गायकवाडने भारताचा डाव सावरला होता. या दरम्यान ऋतुराजने 129 बॉलमध्ये 117 धावा ठोकल्या होत्या. या खेळीत त्याने 12 चौकार लगावले होते. अशाप्रकारे ऋतुराज गायकवाडने भारताला विजयाच्या नजीक पोहोचवलं होतं. त्यानंतर निशांत संधु 29 धावा आणि हर्षित राणाने 6 धावा करून भारताला हा सामना 4 विकेटने जिंकून दिला. साऊथ आफ्रिकेकडून टीआन वुरेन, बीजॉर्न फॉरच्यून, ऑटनेल बार्टमनने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या होत्या.
दरम्यान साऊथ आफ्रिकेकडून डिलेनो पोटगिटरने सर्वाधिक 90 धावांची खेळी केली होती. त्याच्या पाठोपाठ डिआन फॉरेस्टर 77 आणि बिजॉन फॉर्चुनने 59 धावा ठोकल्या होत्या या बळावर साऊथ आफ्रिके 285 धावा केल्या होत्या. भारताकडून अर्शदिप सिंह आणि हर्षित राणाने दोन विकेट घेतल्या होत्य़ा. प्रसिद्ध, रियान पराग, निशांत सिंद्धु आणि नितीश रेड्डीने एक विकेट घेतली होती.
