खरं तर साऊथ आफ्रिकेने नुकताच आपला दुसरा डाव 5 विकेट गमावून 260 धावांवर घोषित केला होता. तर पहिल्या डावातील 288 धावांची आघाडी या बळावर साऊथ आफ्रिकेने टीम इंडियासमोर 548 धावांची आघाडी घेतली होती.त्यामुळे टीम इंडियासमोर 549 धावांचे लक्ष्य आहे. चौथ्या दिवसाच्या खेळ संपायलवा अवघा एक तास उरला असताना साऊथ आफ्रिकेने आपवा डाव घोषित केला होता.त्यामुळे मिळून जूळून टीम इंडियाला आज फक्त 18 ओव्हरच फलंदाजी करायची होती.त्यामुळे टीम इंडियाची यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल ही सलामी जोडी इतक्या ओव्हरचा आरामात सामना करून एकही विकेट गमावणार अशी अपेक्षा होती. पण टीम इंडियाची सूरूवात खराब झाली.
advertisement
टीम इंडियाकडून आज या महत्वाच्या सामन्यात केल एल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही खेळाडूंकडून मोठ्या धावांची अपेक्षा होती. पण यशस्वी जयस्वाल अवघ्या 13 धावांवर बाद झाला होता.त्याच्या पाठोपाठ राहुल भारताचा डाव सावरेल असे वाटत होते. पण तो देखील 6 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर साई सुदर्शन आणि कुलदीपला नाईट वॉचमन म्हणून मैदानात बोलावले होते.यावेळी दोघांनीही साऊथ आफ्रिकेच्या भेदक माऱ्याचा आणि स्पिनर गोलंदाजीचा सामना करत तिसरी विकेट घेऊच दिली नाही.त्यामुळे चौथ्या दिवसअखेर भारताच्या धावा 27 वर 2 विकेट आहेत.आता टीम इंडियासमोर अजून 522 धावांचे आव्हान आहे. तर साऊथ आफ्रिकेला जिंकण्यासाठी 8 विकेटची आवश्यकता आहे.
दरम्यान साऊथ आफ्रिकेने दुसऱ्या डावातही चांगली फलंदाजी केली होती. साऊथ आफ्रिकेकडून दुसऱ्या डावात स्टब्सने 94 धावांची सर्वाधिक खेळी केली आहे. त्याच्या पाठोपाठ टोनी डो झोर्झीने 49 धावांची खेळी केली आहे.या धावांच्या बळावर चौथ्या दिवशी साऊथ आफ्रिकेने 5 विकेट गमावून 260 धावांवर आपला डाव घोषित केला होता. पहिल्या डावातील 288 धावांची आघाडी या बळावर साऊथ आफ्रिकेने टीम इंडियासमोर 548 धावांची आघाडी घेतली होती.त्यामुळे टीम इंडियासमोर 549 धावांचे लक्ष्य आहे.
