TRENDING:

Soybean Tikki : चव हॉटेल सारखी, घरीच बनवा प्रोटीन युक्त सोयाबीन ग्रेव्ही टिक्की, रेसिपीचा संपूर्ण Video

Last Updated:

प्रोटीनयुक्त सोयाबीन टिक्की खाण्याचा विचार आला असेल, तर घरगुती मसाल्यात सोयाबीन टिक्की बनवण्यासाठी कमी साहित्यात सेम हॉटेलसारखी टिक्की आपण बनवू शकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ठाणे : प्रोटीनयुक्त सोयाबीन टिक्की खाण्याचा विचार आला असेल, तर घरगुती मसाल्यात सोयाबीन टिक्की बनवण्यासाठी कमी साहित्यात सेम हॉटेलसारखी टिक्की आपण बनवू शकतो. चव येण्यासाठी बाहेरचे कोणतेही मसाले विकत आणण्याची गरज नाही किंवा सॉसही वापरण्याची गरज नाही. साधी आणि सोपी झटपट घरगुती पद्धतीत सोयाबीन टिक्की आपण बनवू शकतो.
advertisement

सोयाबीन टिक्की रेसिपी साहित्य

भिजवलेले सोयाबीन, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, बेसन (आवश्यकतेनुसार), गरम मसाला, धने पावडर, हळद पावडर, लाल मिरची पावडर, मीठ (चवीनुसार),  बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा कसुरी मेथी, तेल हे साहित्य लागेल.

Health Tips : हिवाळ्यात त्वचेला मिळेल नॅचरल ग्लो, सकाळच्या वेळी प्या बिट ज्यूस, आणखी हे फायदे पाहा

advertisement

सोयाबीन टिक्की कृती

सोयाबीन भिजवणे: सोयाबीनचे तुकडे गरम पाण्यात सुमारे 15-20 मिनिटे किंवा ते मऊ होईपर्यंत भिजत ठेवा. यामुळे त्यांचा तीव्र वास निघून जातो आणि ते लगेच शिजतात.

पाणी काढणे: भिजवलेले सोयाबीनचे तुकडे चांगले पिळून त्यातील सर्व पाणी काढून टाका. त्यानंतर ते एका भांड्यात मॅश करून घ्या किंवा मिक्सरमध्ये पेस्ट बनवू शकता.

advertisement

मिश्रण तयार करणे: मॅश केलेल्या सोयाबीनमध्ये बारीक चिरलेला कांदा, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, हळद, गरम मसाला, धने पावडर, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून एकत्र करा. कसुरी मेथी.

मिश्रण घट्ट करणे: मिश्रण एकत्र करून घ्या आणि ते घट्ट होण्यासाठी गरजेनुसार बेसन घाला. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व साहित्य एकजीव करा.

advertisement

टिक्की बनवणे: तयार मिश्रणाचे गोल किंवा चपटे आकारात टिक्की वळा.

शिजविणे: एका पॅनमध्ये तेल गरम करून टिक्की सोनेरी तपकिरी रंगाच्या होईपर्यंत शॅलो फ्राय करा किंवा तळून घ्या.

त्यानंतर कांदा, मसाले, हळद, तिखट मसाला एका कढईत शिजवून गरम पाणी टाका. एक उकळी आल्यानंतर शिजवलेले टिक्की त्यात टाका. पुन्हा एक उकळी येऊ द्या. वरून कोथिंबीर घालावी. अशा प्रकारे सोयाबीन ग्रेव्ही टिक्की तयार.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शारीरिक दिव्यांगत्वाला बनवली ताकद, क्रिकेटपटू साजीद तांबोळीची टीम इंडियात निवड
सर्व पहा

सर्व्ह करणे: गरमागरम सोयाबीन टिक्की सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Soybean Tikki : चव हॉटेल सारखी, घरीच बनवा प्रोटीन युक्त सोयाबीन ग्रेव्ही टिक्की, रेसिपीचा संपूर्ण Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल