टीममध्ये झालेले दोन्ही बदल करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, असं सूर्यकुमार यादव टॉसवेळी म्हणाला. अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह हे दोघंही या सामन्यात खेळत नाहीयेत. अक्षर पटेलला बरं नसल्यामुळे तो खेळत नाहीये, तर जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांमुळे घरी गेला आहे, असं सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलं आहे. नेमक्या कोणत्या कारणामुळे बुमराह घरी गेला? हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. पुढच्या सामन्यांसाठी बुमराह उपलब्ध असेल का नाही? याबाबतची माहिती नंतर मिळेल, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.
advertisement
जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्याऐवजी हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांना भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. शुभमन गिल फॉर्मसाठी संघर्ष करत असताना त्याच्याऐवजी संजू सॅमसनला संधी दिली जाईल, असं बोललं जात होतं, पण तरीही संजूला बेंचवरच बसावं लागणार आहे.
भारताची प्लेइंग इलेव्हन
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती
दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग इलेव्हन
रिझा हेन्ड्रिक्स, क्विंटन डिकॉक, एडन मार्करम, डेवाल्ड ब्रेविस, ट्रिस्टन स्टब्ज, डोनवन फरेरा, मार्को यानसन, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्किया, लुंगी एनगिडी, ओडनिल बार्टमन
