जॉर्जने वैभव सूर्यवंशीसोबत 227 रनची ओपनिंग पार्टनरशीप केली. जॉर्जने या सीरिजच्या 3 सामन्यांमध्ये 143 रन केले. जॉर्जला दक्षिण आफ्रिकेचा बॉलर जेसन राऊल्सने आऊट केलं. डॅनियल बॉसमेनने जॉर्जचा कॅच पकडला.
एरॉन जॉर्ज हा राईट हॅन्डेड टॉप ऑर्डर बॅटर आहे. याआधी एरॉन जॉर्जने वैभव सूर्यवंशीसोबत अंडर-19 आशिया कपमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं होतं. हैदराबादमध्ये लहानाचा मोठा झालेल्या एरॉनने एज-ग्रुप क्रिकेटपासूनच छाप पाडायला सुरूवात केली, यामुळे त्याची देशांतर्गत यूथ टुर्नामेंट आणि राज्याच्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये निवड झाली. जॉर्जने विनू मांकड ट्रॉफीसारख्या स्पर्धांमध्येही भाग घेतला, ज्याच्या दोन मोसमांमध्ये त्याने 341 आणि 373 रन केले. बिहारविरुद्ध नाबाद 303 रन केल्यानंतर जॉर्ज 2022-23 विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये टीमचं नेतृत्व करत आहे.
advertisement
वडिलांचं स्वप्न तुटलं
जॉर्जने मागच्या वर्षी 2025 च्या अंडर-19 आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक केलं. 85 रनच्या या खेळीनंतर त्याची तुलना संजू सॅमसनसोबत केली जाऊ लागली. एरॉन जॉर्जच्या वडिलांचं नाव इसो वर्गीस आहे. इसो यांनाही क्रिकेटपटू व्हायचं होतं, पण पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही. आपल्याला क्रिकेट खेळता आलं नाही, म्हणून इसो यांनी मुलाला क्रिकेटपटू बनवायचं ठरवलं. आता वडिलांचं हे स्वप्न एरॉन पूर्ण करत आहे.
एबी डिव्हिलियर्सला हिरो मानतो जॉर्ज
एरॉन जॉर्ज हा दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू एबी डिव्हिलियर्सला त्याचा हिरो मानतो. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये एरॉन जॉर्जने याबद्दल खुलासा केला होता. 'एबी डिव्हिलियर्सची रेंज, कोणत्याही बॉलवर शॉट मारण्याची क्षमता, हे कौशल्य आहे. एका बॉलवर दोन किंवा त्यापेक्षा जास्त शॉट असणं तुम्हाला वेगळं करतं. मला मैदानात त्याचा शांत स्वभाव खूप आवडतो. तो मैदानावर वाद घालत नाही, क्रिकेटच्या मैदानात तो खरा जेंटलमन आहे', असं जॉर्ज म्हणाला होता.
