शुभमन संघासोबत गुवाहाटीसाठी प्रवास
रुग्णालयात गिलला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते आणि दुसऱ्या दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने दिलेल्या उपचारांना शुभमन गिल चांगला प्रतिसाद देत आहे. तो 19 नोव्हेंबर 2025 रोजी संघासोबत गुवाहाटीसाठी प्रवास करणार आहे. मग शुभमन गिल दुखापत असताना मॅच खेळणार की काय? असा मोठा प्रश्न विचारला आहे.
advertisement
प्रकृतीचा अंदाज घेऊन निर्णय - बीसीसीआय
शुभमन गिल याच्या प्रकृतीवर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक सतत लक्ष ठेवून असेल. त्याच्या दुसऱ्या कसोटीतील सहभागाबाबतचा अंतिम निर्णय त्याच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन नंतर घेतला जाईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. मात्र, शुभमन गिलला प्रवास करण्यास किंवा विमानाने कुठेही जाण्यास डॉक्टरांनी मनाई केली होती. तर आता शुभमन दुखापतग्रस्त असताना जिवाशी खेळतोय का? असा सवाल विचारला जातोय.
पुन्हा कसोटी संघात सामील होणार?
दरम्यान, शुभमन गिल जर अशा दुखापतीमध्ये खेळला तर ते आश्चर्य असेल, असं डॉक्टरांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यामुळे शुभमनच्या निर्णयावर बीसीसीआयचं देखील लक्ष असणार आहे. TimesofIndia.com ने दिलेल्या वृत्तानुसार, शुभमन गुरूवारी गुवाहटीला येथे पुन्हा कसोटी संघात सामील झाला. जर गिल मालिकेच्या अंतिम सामन्यासाठी अनुपलब्ध असेल. अशातच गंभीरच्या भूमिकेवर देखील लक्ष असेल.
